फार्दापुर उप केंद्रात45 बालकाची मोफत आरोग्य तपासणी

फार्दापुर उप केंद्रात45 बालकाची मोफत आरोग्य तपासणी
 फर्दापुर( प्रतिनिधी)हक्कानी शेख 

सोयगांव तालुक्यातील फरदापुर येथील उपकेंद्रात मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिरात 45 बालकांचे मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले
कुपोषण मुक्त अभियानाचे आयोजक संजय शहापूरकर यांनी सांगितले की लोकसहभागातून सुरू असलेल्या या उपक्रमासाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ जी शिंदे यांनी सहकार्य केले असून आता तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधी दिली जाईल कुपोषित बालक जोपर्यंत साधारण श्रेणीत येत नाही तोपर्यंत त्याची आरोग्य तपासणी केली जाईल व त्याला औषधी दिली जातील
        यानंतर डॉ प्रियदर्शिनी पवार यांनी बालकांची आरोग्य तपासणी केली त्यानंतर संजय शहापूरकर यांच्या हस्ते मोफत औषधी वाटप करण्यात आली
यावेळी 16 अंगणवाड्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका उपस्थित होत्या,

Post a Comment

0 Comments