बार्शीटाकळी प्रतिनिधी,मुफिज़ अहमद खान
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गुलाबराव गावंडे, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप मुंबई, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष रामजी मुळे, भैय्यासाहेब गावंडे उपाख्य संग्राम गावंडे, अकोला जिल्हाध्यक्ष सुरेशदादा ठाकरे यांचे आदेशावरून पत्रकार प्रदीप दत्ता रामजी गावंडे यांची मंगळवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली आहे,
मंगळवारी सकाळी अकोला येथील जुन्या आरटीओ कार्यासमोर असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली, यावेळी अकोला जिल्हा बंद करण्यासाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, मंगळवारी अकोला येथे झालेल्या बैठकीमध्ये बार्शी तालुक्यातील पिंजर येथील पत्रकार प्रदीप दत्तारामजी गावंडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली आहे, त्यांची ही निवड जिल्हाध्यक्ष सुरेश दादा ठाकरे यांनी एका पत्रकार द्वारे केली आहे, यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष राम मुळे,
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा ठाकरे, डॉक्टर अमोल रावणकार, एडवोकेट अमोल सूर्यवंशी ,
अकोला महानगर अध्यक्ष विपुल माने, प्रेम पाटील गावंडे दापुरा, बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष साहेबराव ठाकरे, महादेवराव गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सतीश पाटील गावंडे, उपाध्यक्ष गणेश पाटील ताठे, अशी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती, सर्व उपस्थित त्यांनी नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गावंडे यांना अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ,आणि शुभेच्छा दिल्यात,
0 Comments