जी एन ए महाविद्यालयातील कबड्डी संघाने राखली विजयाची परंपरा.

जी एन ए महाविद्यालयातील कबड्डी संघाने राखली विजयाची परंपरा. 
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी.मुफ़िज़ अहमद खान


नुकतेच  श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे दिनांक ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३ ला अतिशय दिमाखदार सोहळ्यामध्ये महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी  स्पर्धेत अनेक महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेतला होता. पैकी गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी तसेच आर डी जी महाविद्यालय अकोला डी.सी.पी महाविद्यालय अमरावती खंडेलवाल महाविद्यालय अकोला असा सामना रंगला होता तर गुलाम नबी आझाद कला वाणिज्य महाविद्यालय महिला कबड्डी चमुने अंतिम सामना लढत मेघे महाविद्यालय बडनेराला हरवून आंतर महाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेचा चुरसीचा सामना जिंकत महाविद्यालयाचे नाव लौकिक केले. या विजयी संघामध्ये कु प्रगती इंगळे, कु पायल श्रीनाथ ,कु अक्षता धारणकार ,कु अंजली धानोरकर, कु राजनंदनी जाधव, कु शालिनी राठोड यांचा खेळ संघाला विजयी मिळून देण्यासाठी उत्कृष्ट ठरला एकूणच या संघातील सर्वच खेळाडूंचे प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना या संस्थेचे संस्थापकअध्यक्ष डॉ मधुकर पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रप्राचार्य डॉ तारेश आगाशे यांचेही अभिनंदन केले डॉ आगाशे हे अगदी कोरोना काळापासून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी  यासाठी शिक्षणासोबतच खेळ आवश्यक असल्याचे सांगत ते विद्यार्थ्यांना प्रेरित करत असतात. यावेळी श्री अरुण  इंगोले यांचेही अभिनंदन केले.त्यांचे या संघाला विशेष मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी यांनीही विजयी संघाचे अभिनंदन करुन  पुढच्या स्पर्धे करिता शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

0 Comments