2022 मध्ये झालेल्या जंगली जनावर च्या हल्ला मध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेला राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेने मिळवून दिला न्याय
अकोला, राष्ट्रीय मानव अधिकार संघटना,शाखा अकोला चे वतीने,ग्राम व्याळा ता.बाळापुर,जि.अकोला येथील तुळसाबाई रामभाऊ सोळंके या महिलेस तिच्या शेतामध्ये सन 2022 मध्ये जंगली जनावर रोही ने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. उपचाराअंती तीचा एक कान निकामी होवून अपंगत्व आले. वरून तिने कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार जिल्हा शासकीय रूग्णालय अकोला येथे जावून संघटनेचे पदाधिकारी यांचे सह रूग्णालयात भेट देवून संपुर्ण घटनेची माहीती दीली. त्यानंतर संबंधित उपचार विभागात जाऊन कागतपत्रांची पुर्तता केली . *सदर महिला हिला कायदेशिर न्याय देवून 33 टक्के अपंगत्व बाबतचे प्रमाणपत्र मिळवुन दिले*. त्यानंतर लगेच सबंधित वन विभाग येथे संघटनेचे पदाधिकारी व सदर महिलेसह जावुन तिला *शासन निर्णयानुसार मोबदला म्हणुन आर्थीक मदत अंदाजे रू 01 ते दिड लाख पर्यंत* मिळणार असल्याचे समजले. *अशाप्रकारे गरीब महीलेची राष्ट्रीय मानव अधिकार संघटना शाखा अकोला चे वतिने मदत केली सदर महीलेला न्याय मीळवुन दिला.* यावेळी जिल्हा अध्यक्ष,सचिव, महमंत्री,सह संघटक ,उप महाव्यवस्थापक व इतर पदाधिकारी हजर होते.
0 Comments