केंद्र प्रमुख शाहिद इक्बाल यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार

केंद्र प्रमुख शाहिद इक्बाल यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार
प्रतिनिधी बार्शीटाकली

 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखा अकोला च्या वतीने दरवर्षीप्रमाणे  जिल्ह्यातील केजी टू पीजी पर्यंत उल्लेखनीय कार्य असणाऱ्या निवडक शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी "कृतिशील शिक्षक पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येते त्या नुसार बार्शीटाकली तालुका उर्दू माध्यमातून श्री शाहिद इक्बाल खान यांची सदर पुरस्कारा करिता निवड झाली असून त्यांना आज मा पालकमंत्री डॉ रणजित पाटील व मान्यवरांचे हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.शाहिद इक्बाल खान उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी आता पर्यंत विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविले आहे त्यांना आतापर्यंत विविध शासकीय व निम शासकीय संस्थांकडून अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे आज आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ. वसंतरावजी खोटरे
माजी शिक्षक आमदार हे होते तसेच पुरस्कार वितरण सोहळा मा.डॉ. रणजीतजी पाटील माजी राज्यमंत्री यांचे शुभ हस्ते संपन्न झाले या वेळीप्रमुख अतिथी
 मानहून माजी आमदार नारायणराव गव्हाणकर
मा.डॉ.अशोकजी ओळंबे प्रदेश निमंत्रित सदस्य भाजपा मा.रतनसिंगजी पवार (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला) मा. डॉ.अपर्णाताई पाटील मा. डॉ. गजाननजी नारे मा. प्रकाश चतरकर 
राज्य कार्यकारी अध्यक्ष
मा. रविभाऊ खेतकर
राज्याध्यक्ष आश्रम शाळा संघटन हे होत या वेळी अकोला जिल्ह्यातील परत्याक तालुक्यातील निवडक शिक्षकांना कुर्ती शील पुरस्कार प्रदान करण्यात आले
 या वेळी शिक्षक संघटने चे नेते वासीमोद्दीन अलीमोद्दीन  गजानन गोत्रकर शिवशंकर अस्वर शाफिक अहेमद खान,उर्दू शिक्षक नेतेकाजी रिजवनोद्दीन हाफीझोद्दीन,राहुल्लह खान राजू कुरेशी आणीसोद्दीन कुतबोद्दीन नावेद अंजुम प्रकाश राठोड जुबेर दुरराणी नावेद अल्लाह सद्दाम हुसेन राजू कुरेशी मो अश्फाक उबेदुल्लाह मो अतिक शब्बीर अहेमद गुलाम फारूक सखाउल्लाह वकार सर अब्दुल रशीद राहुल्लह खान असजला खान साजिद अन्सारी जाहेदउर रहेमान मुजीब बेग सै आसरार रिजवान अहेमद साजिद अन्सारी नामदेव देवकते आदी मोठ्या संख्याने शिक्षक उपस्थित होते शाहिद इक्बाल खान यांना सदर पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments