तांबापूर व सुप्रीम कॉलोनी परिसरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणे गर्जे चे,
प्रतिनिधि,फरहान शेख

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेअंतर्गत जळगाव शहरामध्ये महानगरपालिका द्वारा संचलित दवाखाने सुरू करण्याची योजना असून प्रत्येक 25 ते 30 हजार लोकसंख्येला एक दवाखाना सुरू करावा अशी योजना आहे. त्याकरता तांबापुर व सुप्रीम कॉलोनी परिसराचा ही सर्वे झाला असून अद्याप दवाखाना सुरु झालेल्या नाही. कृपया याबाबत आपण त्वरित अंमलबजावणी करावी तांबापूर परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे आपलदवाखाना त्वरित सुरु करावा अशी मांगनी ताबापुर निवासी करीत आहे,
तांबापुरा व सुप्रीम कॉलोनी मध्ये मोलमजुरी करणारे कष्टकरी लोक राहतात व अतिशय अल्प उत्पन्नात घर संसार चालवतात.
छोटे घर, दाट वस्ती, अस्वच्छ गटारी, या मुळे तांबापूरात लहान मोठे आजार सतत उद्भवतात. तुटपुंज्या कमाई मूळे मोठ्या दवाखान्यात जाणे त्यांना परवडत नाही. महाराष्ट्र शासनाच्या आपला दवाखाना योजनेअंतर्गत तांबापुर परिसरामध्ये आपला दवाखाना सुरू करावा,अशी मांगनी ताँबापुर फाउंडेशन चे अध्यक्ष मतीन पटेल,फारुख कादरी,आबिद शेख,रज़्ज़ाक़ पटेल, आदिल शेख,अरमान पटेल यांनी निवेदन द्वारे केली आहे