फर्दापूर पोलिसांनी 48 तासात चोरट्यांसह सामान ताब्यात घेतले
फर्दापुर (प्रतिनिधी) हक्कानी शेख
फर्दापुर,प्रजीतसिंग चंचलसिंग भटटल 47 वर्षे व्यवसाय न्यु के. एस. ट्रान्सपोर्ट राजबिंदा इस्टेट शहानुरवाडी जि. औरंगाबाद यांनी दिनांक 05/09/2023 त्यांच्या स्वत: च्या ब्रिस्टॉन कंपणीचे ट्रक दोन टायर व डिक्स एकुण 72000/- रुपए अज्ञात आरोपींनी चोरी केले ची फिर्याद दिली होती .फर्दापूर पोलिसांनी 48 तासात चोरट्यांसह सामान ताब्यात घेतले सिल्लोड उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे यांचे मार्गदर्शनवर फर्दापुर पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे त्यांच्या पथकासह तपास सुरू केला.ही चोरी फर्दापूर शिवारातील धनवट शिवर व त्याच गावातील राजकुवर महाविद्यालयासमोर घडली होती.त्याच ठिकाणी पोहोचून तपास केला असता, ट्रक क्र. एम. एच. 26 एडी 3144 ड्रायव्हर अर्जुन गौरीशंकर प्रसाद 35 वर्षे रा. थमणपुरा तालुका बासडी जि. बलिया राज्य उत्तरप्रदेश व क्लिनर सुशिल शिवविलास प्रसाद 23 वर्षे रा. हल्दी पोस्ट अलमपुर जिल्हा बलिया राज्य उत्तरप्रदेश त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरी झाल्याचे उघड झाले.। चोरीचा माल कुठे आहे?, असे विचारले असता तो म्हणाला फर्दापूर गावात टायर पंक्चर काढण्याचे मुहमद अजमल शेख 22 वर्षे रा. ह. मु. फर्दापुर मुल रा. मुपो मगदुमपुर कुदरिया जि.मज्जफरपुर राज्य बिहार घेतला। त्यानंतर पोलिसांनी टीम पंक्चर दुकान गाठून तिघांनाही ताब्यात घेतले.तेथे 03 दिवसांचा पीसीआर घेण्यात आला. त्यांच्याकडून पोलीसाने 52000/- रुपए किंमतीचे ब्रिसटॉन कंपणीचे दोन टायर व 20000/- रुपए किंमतीचे दोन लोखंडाचे डिक्स ऐशी एकुण 72000/- रुपए कीमतीचे मुददेमाल जप्त केले. ही कारवाही पोलिस यांने 48 तासांत ही कारवाई करण्यात आली मा. पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे त्यांच्या मार्गदर्शनावर सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे, पोलिस नाईक निलेश लोखंडे, पु.कॉ योगेश कोळी, प्रकाश कोळी, भरत कोळी, सतिश हिवाले, प्रदिप बेदरकर, जगदिश सोनवणे, आनंद पगारे यांनी केली.
0 Comments