मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास फडणवीसांनीच मला रोखलेमहाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास फडणवीसांनीच मला रोखले
महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई / प्रतिनिधी
फडणवीस सरकारने आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाची ठरवून दिशाभूल आणि फसवणूक केल्याचे पुरावे एक एक करून पुढे येत असून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपणाला रोखले होते' असा खळबळजनक गौप्यस्फोट महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला आहे,
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या मुळेच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही, असा खुलासा कुंभकोणी यांनी केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे. अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण आता घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्र सरकारचे माजी सोशल मीडियात एक व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोश कुंभकोणी हे मराठा आरक्षणाच्या प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी एकदाही उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात गेले नाहीत. महाधिवक्ता म्हणून वा प्रकरणात युक्तिवाद करणे हे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांनी तसे केले कर्तव्य होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे या नकारात्मक निर्णयाला तेही जबाबदार आहेत, असे कटनेवरकर यांनी म्हटले आहे. कुंभकोणी यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत मराठा आरक्षण प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात फेब्रुवारी २०१९ मध्ये सुनावणी सुरू झाली होती. त्याआधी जानेवारी महिन्यात माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांना युक्तिवाद करण्याची परवनागी द्यावी, अशी मागणी पुढे आली.
फडणवीस यांनी ती मागणी मान्य करून थोरात यांना बाजू मांडण्याची संधी देण्याची सूचना माझ्याकडे केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री वकील निशांत कटनेश्वरकर यांनी फडणवीस यांच्या त्या सूचनेनुसारच मी खटल्यापासून दूर राहिलो होतो,' असे कुंभकोणी यांनी म्हटले आहे.
२०१४ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्यावेळीही मराठा आरक्षण विरोधी याचिका दाखल करणाऱ्या केतन तिरोडकर यांना फडणवीस यांचीच फूस होती. इतकेच नाही तर स्वतःच दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्दबातल करण्यासाठी फडणवीस यांनीच गुणरत्न सदावर्ते नावाचे पात्र उमे केले असा संशय काही मराठा संघटनांनी व्यक्त केला आहे.
------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments