मराठवाडा मुक्तिदिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करणार आत्मदहन |
फर्दापुर प्रतिनिधि,हक्कानी शेख
सोयगाव येथील तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे गरज नसतांना पंधरा शिक्षकांच्या सोयीस्कर प्रतिनियुक्तीसाठी आर्थिक देवाण -घेवाणीचा व्यवहार झाला असून गरजवंत शिक्षकांना यातून डावलण्यात आले. तसेच प्रत्येक कामासाठी कार्यालयात आर्थिक चिरमिरी देऊन कामे करावी लागतात.प्रभारी शिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांना प्रतिनियुक्त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतांना वर्षानुवर्षे प्रतिनियुक्याद्वारे शिक्षक एकाच ठिकाणी ठाण मांडून शेती व दुय्यम व्यवसाय करतात त्यांच्या प्रतिनियुक्या रद्द करण्यात याव्या तसेच ईतर मागण्यासंदर्भात शिक्षणविभाग अपयशी ठरले असल्याने नाईलाजाणे बहुलखेडा येथील एका शिक्षकाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कुटूंबा सह आत्मदहन करण्याचा निर्धार केला आहे.
बहुलखेडा ता. सोयगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक निजामोद्दीन मुगणी सिद्दीकी यांनी जिल्हा परिषद औरंगाबाद शिक्षण विभागात अनेक वेळा वारंवार मौखिक, लेखी विनंती तसेच उपोषण करून सोयगाव येथील तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून न्याय मागितला आहे. तसेच सेवा निवृत्ती बाबत अनेक अडचणी सोडविण्याची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे जिल्हा परिषद सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे.
सोयगाव येथील प्रभारी शिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव यांना प्रतिनियुक्त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतांना तालुक्याअंतर्गत अनेक शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांची स्वतः ची सोया व्हावी यासाठी विभागीय आयुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी घालून दिलेल्या सुचनांना बगल देत सेवाजेष्ठता डावलून अनेक शिक्षकांना कारण नसतांना व शैक्षणिक पात्रता नसतांना गट समन्वयक व केंद्रप्रमुख पदावर प्रतिनियुक्या देण्यात आल्या आहेत.
नियमानुसार प्रतिनियुक्या देण्यात आलेल्या सर्व शिक्षकांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात ३० जून ला प्रतिनियुक्त्या रद्द करायला पाहिजेत. मात्र त्याप्रकारची कोणतेही काम न होता तात्पुरत्या व्यवस्थेच्या नावाखाली गट शिक्षण अधिकारी कार्यालयात पैसे घेऊन प्रतिनियुक्त्या देण्याचे सत्र सुरू आहे.
याप्रकरणी उच्च स्तरिय विभागीय चौकशी करण्यात करण्यात येऊन कारवाई करण्याच्या व ईतर मागण्यांसाठी बहुलखेडा ता. सोयगाव येथील सहशिक्षक निजामोद्दीन मुगणी सिद्दीकी हे कार्यालयासमोर कुटूंबा सह आत्मदहन दहन करणार असल्याचे निवेदन त्यांनी राज्यपाल, मुख्य सचिव व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना देण्यात आले आहे.
कोड :
माझ्याकडे सोयगाव गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचा प्रभारी पदाचा पदभार असून माझ्या कार्यकाळात फक्त चार ते पाचच शिक्षकांच्या प्रतिनियुक्या केलेल्या आहेत, काही शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या पत्राने करण्यात आल्या असून उर्वरित शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या माझ्या कारकिर्दीतील नाहीत. त्या प्रतिनियुक्त्या मी चार्ज घेण्यापूर्वीच्या आहेत.
- रंगनाथ आढाव
0 Comments