अकोला जिल्हा अध्यक्ष व विभागीय पदाधिकाऱ्यांचे उपस्थितीत देण्यात आले जिल्हा प्रशासनाला निवेदन
ता, प्रतिनिधी
आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे राज्य अध्यक्ष इल्हाजोद्दीन फारुकी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना जिल्हा शाखा अकोला च्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या तात्काळ सोडविण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले अकोला जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असून समायोजन प्रक्रिया तातडीना राबवावी तसेच डीसीपीएस कर्मचारी यांच्या पावत्यांमध्ये तफावत असून सदर पावत्या दुरुस्त करून देण्यात यावी या बाबत मुख्यालेखा वित्त अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली तसेच मध्य भोजन योजना अंतर्गत शाळांमध्ये खिचडी शिजविणारे स्वयंपाकी व मदतनीस यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन प्रलंबित आहे त्यांचे मानधन तत्काळ अदा करण्यात यावे तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत मुख्याध्यापक यांच्या खात्यात प्रत्यक महिन्याला भाजीपाला व इंधन इत्यादी रक्कम जमा होते परंतु सदर रक्कम चे विवरण येत नसल्याने सदर रक्कम किती व कशाची या बाबत मुख्याध्यापकांना अडचण येत आहे करीत याचे विवरण देण्यात यावी तसेच उपरोक्त सर्व बाबीचे निराकरण करण्याबाबत संघटनेच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात आली
या वेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे जिल्हाध्यक्ष डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान विभागीय अध्येक्ष आणीसोद्दीन कुतबोद्दीन जिल्हा सचिव यासीर अरफात महिला जिल्हाध्यक्ष कमरूननिसा बेगम जिल्हा उपाध्यक्ष साजिद अन्सारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद अशफाक जिल्हा कार्य अध्येक्ष राहुल्लह खान सरफराज खान मो कलिम मो फारूक गुलाम दस्तागिर शब्बीर अहेमद शेख मन्नान शेख राजू सखाउल्लाह खान समिउल्लाह खान अब्दुल रशीद अब्दुल बशीर नावेद उल्लाह खान आदी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते
0 Comments