महान येथील काटेपुर्णा धरणात पिकनिक साठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यु.

 महान येथील काटेपुर्णा धरणात पिकनिक साठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यु.
बर्सीटाकली प्रतिनिधि,
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने रात्री  चक्क दोन वाजता शोधुन काढला  15 वर्षिय युवकाचा मृतदेह |
पथकाच्या जलतरण पटु डीप स्विमरची धाडसी कामगीरी
17 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान बार्शीटाकळी येथील पोलीस आणी नातेवाईकांच्या सांगण्यावरून पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ सर यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना महान धरणात एक युवक बुडालेला असल्याची  माहीती दीली आणी तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले यावेळी जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी विष्णू केवट,शेखर केवट, यांना घेऊन घटनास्थळ घाठले यावेळी दिपक सदाफळे यांनी वाचलेल्या दोन युवकांचे समुपदेशन करत सदर घटनेची माहीती अवगत केली असता मिळालेल्या माहितीनुसार16 ऑगस्ट रोजी दुपारी बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील अंदाजे 13 ते 15 वर्ष वयोगटातील तीन युवक यामध्ये खिजर अहेमद शब्बीर अहेमद,सय्यद कौसेन सय्यद सलीम, रा.बार्शीटाकळी येथे पाहुणा आलेला म.दानीश म.आबीद रा.भातकुली जिल्हा अमरावती हे तीन मित्र महान येथील काटेपुर्णा धरणात पिकनिक साठी गेले होते. तीघांनाही पोहन येत नसल्याने तीघांनीही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत एकमेकांना पकडुन धरणात उतरले थोडया अंतरावर चालत गेले असता पाण्याच्या लाटा अंगावर आल्या एकावर एक लाट अंगावर येत असतांना डोक्यावरुन लाटा जाऊ लागल्याने तोल सुटला व  एकमेकांचे हात सुटले यात कसे बसे सय्यद कौसेन सय्यद सलीम आणी भातकुली येथील मो.दानीश मो.आबीद हे काठावर आले परंतु यातील खीजर अहेमद शब्बीर अहेमद हा खोलपाण्यात ओढल्या गेला यावेळी त्यानेही यातील एकाचा हात पकडण्याचा दोन वेळा आटोकाट प्रयत्न केला परंतु तीघांनाही पोहण येत नसल्याने आणी धरणात पाणी साठा फुल असल्याने अन त्यात वाहणा-या लाटा यामुळे सगळे प्रयत्न अपयशी झाले अन शेवटी खीजर अहेमद हा पाण्यात बेपत्ता झाला.सदर घटनेची माहीती हे युवक घाबरलेले असल्याने घरच्यांना रात्री उशीरा सांगीतले लगेचच सर्व माहीती अवगत करुन घेताच रात्री दोन वाजता पिआय राहुल वाघ सर यांच्या आदेशाने जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी रेस्क्यु टार्च काढुन सिन टार्गेट केला आणी माहीती घेतलेल्या ठीकाणी तंतो तंत टार्चचा राऊंड सेट केला आणी आपले स्विमर विष्णु केवट,शेखर केवट,यांना पाठवुन पाण्यात अंडरवाॅटर सर्चींग चालु केले यावेळी कुठं 15 तर कुठ 7 - 8 फुट खोल पाणी होते अर्धातास शोधुनही काहीच मिळत नाही नंतर पुढील तिसरा टप्पा 15 फुटाच्या पुढे सर्चीग  चालुकेले असता 2:30 वाजता धरणातील तळाशी असलेला खीजर अहेमदचा मृतदेह शोधून बाहेर काढला 
यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ सर,महान बीट चे दत्तात्रय चव्हाण साहेब, रायटर स्वप्नील बडगे साहेब, बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे हे.काॅ.भुषण मोरे साहेब,पो.काॅ. नागसेन वानखडे साहेब,पो.काॅ. अमित सुगंधी साहेब आणी बार्शीटाकळी येथील नातेवाईकांसह मोठया प्रमाणावर नागरीक उपस्थित होते अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Post a Comment

0 Comments