आज मलकापूर येथे राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील ८०० कोटी रुपये किंमतीच्या व ४५ किमी लांबीच्या नांदुरा ते चिखली सेक्शन चौपदरीकरणाचे लोकार्पण
अधिकार्यांच्या उपस्थितीत लोकार्पण केले.
आजच्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील ८६६ कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांची घोषणा केली.
देशातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेले राज्य आणि सर्वाधिक पायाभूत प्रकल्पांचे संचालन करणारा महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील ८०० कोटी रुपये किंमतीच्या आणि ४५ किमी लांबीच्या मार्गाचा चौपदरीकरण प्रकल्प आज राष्ट्राला समर्पित केला जात आहे, ज्यामुळे बुलढाणावासियांच्या प्रगतीला आणि समृद्धीला चालना मिळेल.
भारतमाला योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील अमरावती-चिखली सेक्शन पॅकेज-४ अंतर्गत चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पात ६ किमी लांबीचा नांदुरा ग्रीनफिल्ड बायपास, मलकापूर आरओबी, ४ मोठे पुल, १८ छोटे पुल, ११ कल्व्हर्ट, ३ वर्तुळाकार अंडरपास, ४ पादचारी अंडरपास, ११.५३ किमी लांबीचे दुपदरी सर्व्हिस रोड, २० बसशेड आणि १ ट्रक ले-बाय यांचा समावेश आहे.
या प्रकल्पामुळे गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशा या चार राज्यांच्या परस्पर व्यापाराला चालना मिळेल. पूर्व-पश्चिम कॉरिडॉरला चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल, ज्याचा रायपूर, नागपूर आणि सुरत यांना लाभ मिळेल.
शेगावचे गजानन महाराज मंदिर, नांदुरा येथील हनुमान मंदिर यांसारख्या धार्मिळ स्थळांना तसेच बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर सारख्या पर्यटन स्थळांना पोहोचणे सुलभ होईल. बुलढाणा जिल्हा ते नागपूर जिल्हा तसेच बुलढाणा ते धुळे, सुरत यांच्या प्रवासाच्या वेळेत कपात होईल. कापूस, लाल मिरची, फळे, धान्य आणि इतर शेतमालाची वाहतूक जलद होईल ज्यामुळे वेळ व इंधन यांची बचत होईल. नांदुरा येथील बायपासमुळे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी तसेच ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.
अमृत सरोवर योजनेंतर्गत सदर महामार्गाच्या बांधकामात तलावांच्या खोलीकरणातून मिळालेल्या मातीचा वापर केल्यामुळे परिसरातील तलावांची जलसाठवणुकीची क्षमता वाढली आहे. या जलसंवर्धनामुळे मलकापूरमधील नागरिकांची पाणी टंचाईची समस्या दूर होईल.
यासोबतच आजच्या कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील ८६६ कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांची घोषणा केली.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या 'सबका साथ सबका विकास सबका प्रयास' या संकल्पनेसह आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे रस्ते प्रकल्प बुलढाण्याची आर्थिक-सामाजिक उन्नती निश्चित करतील.
यावेळी रावेर च्या खासदार मा.रक्षाताई खडसे जी, माजी मंत्री आ.संजय कुटे जी,आ.ॲड.आकाश फुंडकर जी,आ.श्वेताताई महाले,
आ.राजेश एकडे जी,माजी आमदार श्री.चैनसुखजी संचेती,आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
0 Comments