तलवार बाळगुन फेसबुकवर फोटो अपलोड करणारा इसम फर्दापुर पोलीसांच्या ताब्यात |

तलवार बाळगुन फेसबुकवर फोटो अपलोड करणारा इसम फर्दापुर पोलीसांच्या ताब्यात|

फर्दापुर (प्रतिनिधी)हक्कानी शेख 

फर्दापुर मध्ये एका व्यक्तीने तलवारीसह फोटो फेसबुकवर अपलोड केला होता, हा फोटो फेसबुकवर वारंवार येत असल्याने फर्दापुर पोलिसांनी तलवारीसह एका व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी 25 रोजी उघडकीस आली.
मा. पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील अवैदयरित्या शस्त्र बाळगणारे इसमांचा शोध घेवुन त्यांना जेरबंद करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत. यावरुन सिल्लोड उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे साहेब यांनी अशा गुन्हे करणारे इसम यांचा शोध कसा घ्यावयांचा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सायबर पोलीस स्टेशन या पोस्टवर कसा प्रकारे नजर ठेवते यांची संपुर्ण माहिती दिली. यावरुन फर्दापुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भरत मोरे व त्यांचे पथकातील पो.ना.निलेश लोखंडे व योगेश कोळी यांचे कडे फर्दापुर फेसबुक सर्कल मध्ये एक इसमांचा फोटो सारखा व्हायरल होत असतांना बाबतची माहिती मिळाल्यावरुन फर्दापुर गांवामधील इसम नामे दिपक जर्नाधन लव्हाळे वय 35 वर्षे रा. फर्दापुर यांने त्यांचे फेसबुक अंकाऊटवर विस इंची तलवार घेवुन फोटो टाकलेला होता व तो फेसबुक अंकाऊटवर व्हायरल होत होता सदर इसमाला ताब्यात घेवुन त्यांचे कडे चौकशी केली असता त्यांने त्यांचे ताब्यातील तलवार ही काढुन दिली, 
असुन त्यांच्या विरुध्द फर्दापुर पोलीस स्टेशन ला गु.रं.नं. 124 / 2023 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 व 25 प्रमाणे गुन्हा दिनांक 25/08/2023 रोजी दाखल करण्यात आला असुन त्यांला सदर च्या गुन्हयामध्ये अ करण्यात आलेली आहे.
तसेच यापुर्वीपण फर्दापुर गांवामध्ये एक इसम विशाल राजु शिंदे वय 35 वर्षे रा. फर्दापुर यांनेपण तलवार घेवुन फेसबुक वर नृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता त्यांचे विरुध्द पण फर्दापुर पोलीस स्टेशनला गु.रं.नं.105/2023 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 व 25 प्रमाणे गुन्हा दिनांक 22/07/2023 रोजी गुन्हा दाखल आहे.
औरंगाबाद ग्रामिण पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन केले जाते की. मोबाईल मध्ये सोसलमिडियाचा उपयोग शस्त्र घेवुन केक कापणे, शस्त्रासह नृत्य करणे, शस्त्र घेवुन फोटो काढणे व ते स्वतःजवळ विनापरवाना बाळगणे हा शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा आहे तसेच दोनधर्मामध्ये तेड निर्माण होईल किंवा एखादयांची भावना दुखावेल असा प्रकारचा स्टेटस किंवा कमेंट करणे हा पण भारतीय दंड सहिंता 1860 कायदयांन्वये गुन्हा आहे. सोसल मिडीया चा उपयोग चांगल्या कामासाठी करावा व चांगल्या उददेशासाठी करावा आपल्या एक पोस्ट मुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रचलीत कायदयाप्रमाणे त्यांचे वर कार्यवाई करण्यात येईल यांचा दक्षता सर्वांनी घ्यावी.
नमुद कार्यवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक श्री. सुनिल लांजेवार, उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. दिनेशकुमार कोल्हे यांचे मार्गदर्शणाखाली सपोनि भरत मोरे, पोना निलेश लोखंडे, पो.कॉ.प्रकाश कोळी, योगेश कोळी, भरत कोळी, सतिश हिवाळे, प्रदिप बेदरकर, जगदिश सोनवणे, योगेश खडके, कविता कुलथे यांनी मिळुन केलेली आहे.

Post a Comment

0 Comments