एम आय्,डी,सी पोलिसाने केले पद्मालय इंग्लीश मिडीयम स्कुल या शाळे मध्ये चोरी चा पर्दाफाश,

 एम.आय्,डी,सी पोलिसाने केले पद्मालय इंग्लीश मिडीयम स्कुल या शाळे मध्ये चोरी चा पर्दाफाश,


जलगाव,प्रतिनिधि,फरहान शेख

दिनांक 07/06/2023 रोजी रात्रीच्या वेळीस शिरसोली गावाजवळ असलेल्या पद्मालय इंग्लीश मिडीयम स्कुल या शाळेतुन कोणीतरी अज्ञात इसमाने रोख 15,000/- रु तसेच इलेक्ट्रीक मोटार, सि. सी. टी. व्ही. कॅमेरे, डि.व्ही.आर., , इन्वेंटर च्या बॅटरी अशा शाळेच्या स्टोअर रुमचे कडी कोंडा तोडुन चोरुन नेले होते तसेच शाळेतील कागदपत्रांचे नुकसान केले होते म्हणुन सदर बाबतीत शिक्षक निशादराज रंगनाथ बारी यांनी दिनांक 07/07/2023 रोजी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाच्या तपासात सदरची चोरी ही शिरसोली गावातीलच काही मुलांनी केली असल्याची माहीती मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांना मिळाली, त्यानुसार काल रात्री शिरसोली गावातुन 1) अजय विजय भिल, वय 22 वर्ष, 2) किरण गोपाळ कोळी, वय 21 वर्ष, 3) मयुर गोपाळ बारी, वय 18 वर्ष, सर्व रा. शिरसोली ता. जि. जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना अटक करण्यात येवून त्यांना आज रोजी न्यायमुर्ती सुर्वणा कुलकर्णी यांचे न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीतांची 02 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली असुन सदरची कारवाई मा. पोलीस निरीक्षक श्री. जयपाल हिरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली स. फो. अतुल वंजारी, पो.हे.कॉ. जितेंद्र राठोड, पो.ना. समाधान टहाकळे, इम्रान सैय्यद, शुध्दोधन ढवळे, किशोर पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी अशांनी केली आहे. सदर आरोपी मजकुर यांचे कडुन अजुन शिरसोली परीसरातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. यापुर्वी आरोपी 01 व 02 यांचेवर शिरसोली गावात हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे.

Post a Comment

0 Comments