मंत्रालय मुंबई येथे आजाद मैदानात दौंड पुणे येथील माजी सैनिकांनचे अमरण उपोषण.

मंत्रालय मुंबई येथे आजाद मैदानात दौंड पुणे येथील माजी सैनिकांनचे अमरण उपोषण. 
            शेख हक्कानी की रिपोर्ट
माहिती अधीकार कार्यकर्ते जयदीप बगाडे यांच्या नेतृत्वाखाली २६ माजी सैनिकांनचे मंत्रालय मुंबई आझाद मैदानात अमरण उपोषण आंदोलन दिनांक ११\०८\२०२३ पासून सकाळी १०वाजता चालू झाले आहे. माजी सैनिक मेजेर हनुमंत बनसी लांडगे, माजी सैनिक अनिल जयवंत खणसे, पवार, शेडगे, सूर्यवंशी, भिसे दिवेकर मोठ्या संख्येने माजी सैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते .दहा वर्षा पासून या माजी सैनिकांनचा निवासी जागे साठी लढा चालू आहे. दौंड तहसीलदार, पुणे जिल्हाधिकारी यांनी यांना ४० आर जमिन मंजूर करून देखील मिळत नाही. मंत्रालयात चलन बनवले जात नाही. 
फक्त हे मागासवर्गीय आहे म्हणून यांना डावले जात आहे. स्थानिक राजकीय नेते यांच्या नातेवाईक यांच्या संस्थेला हि जमीन पाहिजे आहे. म्हणून मंत्रालयातील अधिकारी यांना दबावाखाली काम करावे लागत आहे. फकत आणि फक्त जातीय द्वेषातून दौंड मधील २६ माजी सैनिकांन वर अन्याय अत्याचार होत आहे. आम्हाला चलन जो प्रयन्त मिळत नाही तो प्रयत्न आम्ही आमचे आंदोलन चालू ठेवणार आसे मेजेर हनुमंत बनसी लांडगे व RTI कार्यकर्ते जयदीप बगाडे यांनी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments