सावद्यातील ॲंग्लो उर्दू शाळेचे प्र.मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई तर दोघांना कारणे दाखवा नोटीस!
पोस्कोच्या गुन्ह्यात अडकलेल्या त्या चौघांवर शाळा संचालक मंडळाची मोठी कारवाई
मुख्याध्यापक इरफान खान वर निलंबनाची कारवाई तर दोन्ही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली
इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी सावदा तालुका रावेर द्वारा संचालित अंग्लो उर्दू हायस्कूल येथे काही
दिवसांपूर्वी या शाळेत संस्था संचालक अकरम खानअमानुलला खान याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्या बाबत सावदा पोलीस स्टेशनला गुरन. 187/2023 नुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणांमध्ये शाळेतील तीन शिक्षक 1) इरफान खान जमशेर खान, - प्र.मु 2) शेख फीरोज शेख सुपडु - उ.शि 3) शेख अरशद शेख सईद - उ.शि. हे सुद्धा आरोपी आहे.
गावात या बाबत पालकांमध्ये संताप व रोष असून.संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने तातडीची बैठक बोलावून या बाबत मोठी कारवाई केली आहे इत्तेहाद एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळा द्वारा
प्र मुख्याध्यापक इरफान खान वर निलंबनाची कारवाई तर दोन्ही शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली संस्थेच्या परिशिष्ट १ प्रमाणे रेकार्ड वरील एकूण सात संचालकांनी कायदेशीर बाबी लक्षात घेता विचार करून कारवाई केली आहे
आरोपी अकरम खान, तसेच आरोपीस शह देणारे त्याचं गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मोठे बंधू विद्यमान अध्यक्ष अकबर खान, संचालक इकबाल शेख कादर मन्यार यांची संस्थेतून हकाल पट्टी करण्यात आली आहे यांच्या कुटुंबातील लोक शाळेत येऊन ढवढा ढवढ करत आहेत सदरील व्यक्ती यांच्यामुळे विद्यार्थिनी शाळेत येण्यास घाबरत आहे .यांना व त्यांचे नातेवाईकांना शाळेत येण्यापासून पोलीस प्रशासन यांनी मज्जाव करावा जेणेकरून मुलींची भीती दूर होईल व मुली शाळेत नियमित उपस्थित राहील , व शाळेचे कारभार सुव्यवस्थित चालतील... या बाबत पण चर्चा करण्यात आली
पोलिसांना त्यांच्या चौकशी कामात निष्पक्ष चौकशी करता यावी म्हणून संस्थेने सहकार्य करणयाचे व नागरीक व पालकांना संयम ठेवण्याची विनंती केली आहे
अशी माहिती संस्थेचे विश्वस्त मंडळाच्या वतीनं अ अजिज अ रशीद यांनी दिली आहे
0 Comments