फर्दापुर ग्रामसेवक व इतर यांची चौकशी करून कायदेशीर कारवाही करण्यासाठी दीपक लव्हाळे यांनी केली मांग

फर्दापुर ग्रामसेवक व इतर यांची चौकशी करून कायदेशीर कारवाही करण्यासाठी दीपक लव्हाळे यांनी केली मांग
      फर्दापुर प्रतिनिधि,  हक्कानी शेख की रिपोर्ट

फर्दापुर,दीपक लव्हाळे त्यांचे फर्दापुर शिवार येथे वडिलोपार्जित शेत गट नंबर 18 असून पैकी ०. 24 आर व पोट खराब ०.०३आर असे एकूण ०.२७ आर ताब्यातील वहिवाटीतील मालकीचे वडिलोपार्जित शेत आहे. त्यात एक बोरवेल असून सातबारावर याची नोंद असून सध्या कपाशीचे पीक, आंबे, पेरू, जांभूळ, चिकूचे वृक्ष आहे.
 या शेत गट नंबर 18 पैकी काही क्षेत्रावर प्लॉट असून सदर प्लॉटचे आदेश २००७ मध्ये झाले असून गट नंबर 18 मध्ये टाकलेले प्लॉटिंग (लेआउट )अवैद्य आहे. असे मा. नगररचना कार्यालय औरंगाबाद यांनी संबंधित लेआउट कार्यवाहीसाठी अभिप्राय पत्र दिलेले आहे. ते पत्र दिनांक ३०/१०/२०१७ चे आहे. एवढे असतानाही संबंधित प्लॉट (लेआउट )मालकाने रस्ते, रोड तयार करण्यासाठी विनापरवानगी गाऊन खनिज उत्खनन केले असून मा. तहसीलदार सोयगाव यांनी संबंधितांवर दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 संबंधित गट नंबर 18 च्या जमिनीमध्ये यापूर्वी सन १९९१ साली ठाणे पिक वेअर प्रकल्पासाठी पाठचारी (कॅनॉल)गेलेली आहे. मा. उपजिल्हाधिकारी,भूसंपादन संस्थेकडून ०.०९ आर शेत्र पारचारी (कॅनॉल) साठी संपादित केलेली आहे. याची नोंद हस्तलिखित सातबारावर फेर आधारे झालेले दिसते. एवढे असूनही संबंधित लेआउट धारकाने मालकाने पारचारी (कॅनॉल)चा कोठेही उल्लेख न करता, पाटचारी (कॅनॉल)न दाखवता शर्तीचा भंग करून अनाधिकृत लेआउट साठी मा.जिल्हाधिकारी यांचे आदेश प्राप्त केलेले आहे. एवढे असतानाही संबंधित लेआउट मालकांनी पाटचारी (कॅनॉल)च्या क्षेत्रावर प्लॉट पाडून कोट्यवधी रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न चालू आहे. असे करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणूक करून संबंधित जागेचा व्यापार करून पैसा कमावण्याचा या भूमाफियांचा मानसिक हेतू आहेत.
 सध्या परिस्थितीमध्ये पाटचारी (कॅनॉल)चा विवादित हा मा.तहसीलदार सोयगाव यांच्या न्यायालयात चालू आहे. या पाटचारी कॅनॉल अतिक्रमणाबाबत संबंधित जमिनीमध्ये पाटचारी (कॅनॉल) असल्याचे प्रमाणपत्र दिनांक २६/११/२०१८ रोजी मा. तहसीलदार सोयगाव यांनी दिलेले आहे. या पाटचारी अतिक्रमणाबाबत महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी झालेली आहे. मा. जिल्हाधिकारी अधिकार वापरून ग्रामपंचायत फर्दापूर येथील ग्रामसेवक यांनी बनावट व खोट्या खरेदी खताला संबंधित क्षेत्रासाठी अ कृषी करण्याची गरज नसण्याची पत्र दिलेले आहेत. ग्रामसेवक यांनी दिनांक २७/०३/२०२३रोजी ग्रामपंचायत अधिनियमांची पालन न करता किंवा कोणतेही दस्त न पाहता खोटे व बनावट नमुना नं. ८ ग्रामसेवक यांनी, टीका खान नुर खान, ग्रामपंचायत अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांनी संगमत करून, पैशाची देवाण-घेवाण करून टीका खान नूर खान यांना दोन नमुना नं.८ तयार करून दिले. सदर व्यक्तीने दि.२७/०४/२०२३ रोजी मोहम्मद अबूबकर मो. मोईनुद्दीन बाबर यांना बेकायदेशीर विक्री केलेले आहे. वास्तविक पाहता असे दस्त बनविण्याचा ग्रामसेवक यांचा कोणताही हक्क किंवा अधिकार नसून पदाचा गैरवापर व आर्थिक देवाण-घेवाण केल्याने दिसून येते. एवढ्यावर ग्रामसेवक न थांबता संबंधित बनावट व खोट्या नमुना नं ८ मध्ये माझ्या वडिलोपार्जित जमिनीच्या चतु:सीमा देऊन माझ्या हक्काला व ताब्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
सदर जमिनीतील काही क्षेत्रावर असलेला क.जा.प झालेला नाही, संबंधित लेआउट ग्रामपंचायत फर्दापुर ला वर्ग झालेला नाही. तरी सुद्धा ग्रामसेवक यांनी दि.२७/०८/२०२२ रोजी पत्र काढून त्यांच्या आदेशान्वये संबंधित अनाधिकृत लेआउट मध्ये पैशांची देवाणघेवाण करून पाईपलाईन टाकून दिली. ग्रामसेवक साहेब यांच्यावर एवढे उदार का झाले!.
 ग्रामसेवक त्यांच्यावर एवढे उपकार का करता आहेत।असा आरोप दीपक लव्हाळे यानी केला आहे.
 या विनंतीची प्रत जिल्हाधिकारी औरंगाबाद ,तहसीलदार ,गटविकास अधिकारी सोयगाव, पंचायत समिति कार्याल सोयगाव यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments