मेरी माटी मेरा देश"अभियान अंतर्गत न.पं.बार्शिटाकळी मध्ये विविध उपक्रम संपन्न,

मेरी माटी मेरा देश"अभियान अंतर्गत न.पं.बार्शिटाकळी मध्ये विविध उपक्रम संपन्न,
बार्सिटाकली प्रतिनिधि,
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रम अंतर्गत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार " मेरी मिट्टी मेरा देश " अभियान जिल्हाधिकारी अकोला व न.प.चे मुख्याधिकारी डाॅ.नरेंद्र बेंबरे यांचे मार्गदर्शनाखाली नगर पंचायत बार्शिटाकळी मध्ये दि.१४ आॅगष्ट ला मातीला नमन व विरांना वंदन करण्याकरिता नगर पंचायत चा आवारात शिला फलकाची उभारणी करण्यात आली 
त्याचे अनावरण न.पं.नगराध्यक्ष महेफूज खान रसुलखान यांचा हस्ते केले व शहरातील माती कलशामध्ये जमा करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी.सैनिक श्रीकृष्ण आखरे राहुल बोडखे,अखिलोद्दीन फैमोद्दीन ,अनिल खाडे ,अनिल ठाकरे,विलास पतींगे , सै.रुकमोद्दीन अ.शकील अ.जलीम यांचा उपस्थित मध्ये केले.यावेळी अधिकारी कर्मचारी व शहरवासीयांनी हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेतली.
 यावेळी स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच सुरक्षेसाठी ज्यांनी बलिदान केले अशा संरक्षण दल,निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी-माजी सैनिकांचा मा नगरसेवक व पदाधिकारी यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्थानिक पारंपारिक पद्धतीने यथोचित सन्मानीत करण्यात आला.तसेच वसुधा वंदन देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्यावर शहरातील डंम्पींग ग्राउंड ,पैसाळी येथे वसुधा वंदन म्हणून विविध देशी प्रजातींच्या 100 रोपट्यांची लागवड करून साने गुरुजी मंडळ,पातुर यांनी यांनी सहकार्याने अमृतवाटिका तयार करण्यात आली.

 व मा नगराध्यक्ष तथा पदाधिकारी,नगरसेवक तसेच न प कर्मचारी यांनी वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यालयावर ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन झाले.तसेच दि.१३ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मागील वर्षी प्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविणे बाबत जनतेला आव्हान करण्यात आलं तसेच राष्ट्रीय ध्वज विक्री बाबत स्टॉलचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले.
  या कार्यक्रमाला नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, उपाध्यक्ष व सभापती आणि नगर सेवक व सेविका यांच्या उपस्थित संपन्न झाला.आणि यशस्वीतेसाठी न.पं.बार्शिटाकळी पदाधिकारी व अधिकारी व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी पुरवठा अभियंता योगेश तायडे यांनी केले सूत्रसंचालन श्री रुपेश पिंजरकर यांनी केले आभार प्रदर्शन अभियंता सै जावेद अख्तर यांनी केले. यावेळी श्री सुनील उगले,मो आदिल तथा इतर सर्व न प कर्मचारी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments