जळगाव: दि. 01 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्यात 2 व 3 ऑक्टोबर पर्यंत नवदुर्गा विसर्जन, दसरा रावण दहन, धम्मचक्र प्रवर्तन दिन व RSS पथसंचलन यासाठी पोलीस विभागाने व्यापक बंदोबस्त तैनात केला आहे.
दि. 2 ऑक्टोबर रोजी 341 सार्वजनिक व 109 खाजगी देवी विसर्जन, 25 ठिकाणी RSS पथसंचलन, 16 ठिकाणी रावण दहन आणि धम्मचक्र दिनानिमित्त मिरवणुका व विविध कार्यक्रम होणार आहेत.
तर दि. 3 ऑक्टोबर रोजी 1528 सार्वजनिक, 182 खाजगी विसर्जन तसेच पारोळा, धरणगाव, चोपडा व मेहुणबारे येथे रथोत्सवाचे आयोजन आहे.
उत्सव काळात शांतता राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून, BNSS व विविध कलमान्वये नोटिसा, तडीपार व हद्दपार कारवाया करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील 81 मंडळ बैठका, शांतता समित्या, मौलाना वाद्यधारक व पोलीस मित्रांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.
सुरक्षेसाठी एक पोलीस अधिकारी प्रति मंडळ अशी योजना राबविण्यात आली असून, विसर्जन मार्गांवर CCTV देखरेख ठेवण्यात आली आहे.
या वेळी जिल्ह्यात 1 पोलीस अधीक्षक, 2 अपर अधीक्षक, 8 उपविभागीय अधिकारी, 29 निरीक्षक, 143 उपनिरीक्षक, 2497 अंमलदार, RCP, SRPF, QRT, स्ट्राईक फोर्स व 1800 होमगार्डसह मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
जळगाव पोलीसांनी मंडळे व आयोजकांना दिलेल्या सुचनांमध्ये मिरवणुका पारंपरिक मार्गाने व ठराविक वेळेत काढाव्यात, आवाजाची मर्यादा 75 डेसिबल पेक्षा कमी ठेवावी तसेच इतर धर्मियांच्या भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments