चोपडा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दोन इस्मासह ८ किलो गांजा जप्त

जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत दोन इसमांना अवैध गांजा वाहतूक प्रकरणी जेरबंद केले आहे.

या कारवाईत तब्बल ८ किलो १२० ग्रॅम गांजा, मोटारसायकल आणि मोबाईल असा एकूण ₹2,28,640 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सत्रासेन ते चोपडा रोडवरून दोन इसम मोटारसायकलवर अवैध गांजा वाहतूक करणार आहेत.

या माहितीनुसार पोलिसांनी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला.

 वाहन तपासणी दरम्यान दोन संशयित इसम मोटारसायकलवर आढळले.

तपासात दोघांची नावे अशी समोर आली —

अविनाश साहेबराव हिवरे (वय 26, रा. खोकरी, ता. वरला, जि. बडवाणी)

रोशन साहेबराव ढिवरे (वय 31, रा. खोकरी, ता. वरला, जि. बडवाणी)

त्यांच्या ताब्यातून पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला —

८ किलो १२० ग्रॅम गांजा (किंमत ₹1,78,640)

होंडा कंपनीची मोटारसायकल (किंमत ₹40,000)

मोबाईल फोन (किंमत ₹10,000)

असा एकूण ₹2,28,640 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे CCTNS क्र. 0256/2025, NDPS कायदा कलम 20(ब), 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, तसेच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 कारवाईत स.पो.नि. शेषराव नितनवरे, पोउ.नि. जितेंद्र वल्टे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोह. विलेश सोनवणे, पो.कॉ. रावसाहेब पाटील (स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोह. राकेश पाटील, पो.कॉ. मनेष गावीत, प्रमोद पवार, तिरुपती खांडेकर आणि किरण पारधी यांनी मोलाची भूमिका बजावली.

Post a Comment

0 Comments