वरणगावात गुन्हे शाखेची कारवाई; दोन गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस जप्त

वरणगाव:
जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार आगामी सण-उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

 त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, वरणगाव शहरातील रिकॉर्डवरील आरोपी संजय गोपाळ चंडेले (वय ५० वर्ष, रा. ऑर्डनेंस फॅक्टरी, वरणगाव) हा विना परवाना शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे.

 त्यानुसार पोलिस पथकाने तिरंगा चौकात सापळा रचून संशयिताला अटक केली.
तपासादरम्यान आरोपीकडून दोन गावठी पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत ₹५०,५०० इतकी आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. २१३/२०२५, कलम ३/२५ शस्त्र कायदा प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर आरोपीवर यापूर्वीही खालीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत:
१) गुन्हा क्र. ०२/२०२२ — आर्म्स अ‍ॅक्ट ३/२५, चरणगाव पो. स्टे.
२) गुन्हा क्र. २८/२०२२ — आर्म्स अ‍ॅक्ट ३/२५, वरणगाव पो. स्टे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रे. पो. उ.नि. रवी नरवाडे, पोहे. गोपाळ गव्हाळे, पोहे. उमाकांत पाटील, पोना विकास सातदीचे, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकों प्रशांत परदेशी, पोकों राहुल वानखेडे व चा. पो. कों. भारत पाटील यांनी संयुक्तपणे केली.

Post a Comment

0 Comments