जळगाव LCB: रावेर तालुक्यात 25kg गांजा जप्त, 1 आरोपी अटकेत

जळगाव:
(७ ऑक्टोबर २०२५) जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २५ किलो गांजासह एकाला अटक केली आहे. ही कारवाई रावेर तालुक्यातील सहस्वलिग गावात करण्यात आली.
 जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थ तस्करी आणि सेवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, मा. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक (जळगाव विभाग) आणि मा. अनिल बडगुजर, उपविभागीय पोलीस अधिकारी (फैजपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सतत उपाययोजना सुरू आहेत.

 दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली की, सहस्वलिग (ता. रावेर) येथील शेतात अवैधरित्या गांजाची लागवड करण्यात आली आहे.
 यानंतर पोउपनि सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला.
 तपासात शेतात सुमारे २५ किलो वजनाचा, १.७० लाख रुपये किमतीचा गांजा (कॅनाबिस) लागवडीत असल्याचे आढळले.
या प्रकरणात आरोपी महेरबान रहेमान तडवी (वय ३२, रा. सहस्वलिग, ता. रावेर) याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्या च्या विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गु.र. क्र. ४२२/२०२५, NDPS कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(च)(२)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 ही कारवाई मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), श्री. विशालस जैस्वाल (पोलीस निरीक्षक, रावेर), पोउपनि सोपान गोरे, पोहवा संदीप चव्हाण, यशवंत टहाकळे, प्रदीप सपकाळे, बबन पाटील, सचिन घुगे, मयुर निकम, भरत पाटील (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी संयुक्तपणे केली.
तसेच रावेर पोलीस स्टेशनचे सपोनि श्रीमती मीरा देशमुख, पोहेको ईश्वर चव्हाण, पोअं संभाजी बीजागरे आणि राहुल परदेशी यांनी या कारवाईत सहकार्य केले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि मनोज महाजन (रावेर पोलीस स्टेशन) हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments