जळगाव: जळगाव सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने गहाळ मोबाईल शोध मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून हरवलेले एकूण 62 अँड्रॉइड मोबाईल, अंदाजे १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे, शोधून हस्तगत करण्यात आले.
सदर ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकात पो.उ.नि. गणेश अहीरे, तसेच सायबर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.
या मोहिमेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून मोबाईल शोधण्यात आले.
हस्तगत केलेले सर्व मोबाईल आज मा. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.
जळगाव पोलिसांनी गहाळ मोबाईलचे IMEI क्रमांक आणि तपशील अधिकृत फेसबुक पेजवर उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, नागरिकांनी आपला हरवलेला मोबाईल CEIR पोर्टलवर नोंदवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0 Comments