कान्हेरी सरप गावात पावसाच्या पाण्याचा प्रशन गंभीर।

कान्हेरी सरप गावात पावसाच्या पाण्याचा प्रशन गंभीर।
कान्हेरी सरप (ता.बार्शीटाकली जि. अकोला)
गावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गजानन आखरे, किसन गव्हाळे व वासुदेव भटकार यांच्या घरासमोर सीमेंट रोड उंच केल्यामुळे तसेच एकनाथ मालखाडे यांच्या घरासमोरील अतिक्रमण आणि झाडाच्या मुळांमुळे नाली पूर्णपणे बंद झाली आहे.
यामुळे पावसाचे पाणी घरात शिरत असून नागरिकांच्या घरगुती वस्तूंचे नुकसान होत आहे. दरवेळी पावसाचे पाणी घरात घुसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे।या प्रकरणी ग्रामस्थांनी माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक नालीवरील अतिक्रमण हटवून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करावा, झाडाची मुळे नाल्यातून काढावी आणि सीमेंट रोडमुळे निर्माण झालेली अडचण सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला नाही तर दर पावसाळ्यात होणारे नुकसान वाढत जाईल.

Post a Comment

0 Comments