*इकरा बोरनार येथे क्रीडा दिवस संपन्न*
इकरा शिक्षण संस्था जळगाव संचलित,अब्दुल मजीद इकरा उर्दू हायस्कूल बोरनार ता.जि.जळगांव येथे दोन दिवसीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. या क्रीडा दिवसाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक शाह सलीम अब्दुल्ला यांच्या हस्ते करण्यात आला. या क्रीडा दिवसांमध्ये मुले आणि मुली यांच्यासाठी वेगवेगळे खेळ होते. इयत्ता पाचवी ते सातवी ज्यूनियर ग्रुप व आठवी ते दहावी साठी सीनियर ग्रुप असे दोन ग्रुप करण्यात आले होते. मुलींसाठी पचास मीटर रनिंग,100 मीटर रनिंग,लिंबू चमचा, सुई धागा, हंडीफोळ, स्लो सायकलींग असे विविध खेळ ठेवण्यात आले होते. तसेच मुलांसाठी सौ मिटर रनिंग, स्लो सायकलिंग, हंडी फोड, क्रिकेट असे वेगवेगळे खेळ खेळण्यात आले. क्रीडा दिवसाची जबाबदारी खेळ प्रमुख फिरोज खान व जव्वाद अंजुम सर यांनी पार पाडली. क्रीडा दिवस यशस्वी करण्यासाठी आरिफ खान सर, शेख रौशन सर, मजहर खान सर, शेख अमीर सर, शेख सादिक सर व शिक्षकेतर कर्मचारी आकीब शेख (लिपिक) मुशताक, युसुफ, शब्बीर यांनी सहकार्य केले. क्रीडा दिवस यशस्वी झाल्याने संस्था अध्यक्ष करीम सालार व सर्व सभासद यांनी बोलनार स्टाफ चा अभिनंदन केले.
रशिद बागवान 8484819485
शाह एजाज 7385612883
0 Comments