सरस्वती विद्यामंदिर पातुर नंदापूर येथे बाल आनंद मेळावा संपन्न
पातुर नंदापुर प्रतिनिधि, रहीम शेख
पातुर नंदापुर येथे सरस्वती विद्यामंदिर बाल आनंद मेळावा संपन्न  करण्यात आला असून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान मिळावे ह्या उद्देशाने सरस्वती विद्या मंदिर येथे लहान मुलांच्या बालआनंद मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे  उद्घाटन सर्व महिलांच्या वतीने करण्यात आले नंतर सरस्वती मातेची व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केले.
तसेच उपस्थित सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये महिलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये डिश डेकोरेशन, पदार्थाची ओळख या स्पर्धेमध्ये विजेता महिलांना इंगोलेताई  अव्हालेताई , बनसोडताई  यांना बक्षीस देऊन स्वागत करण्यात आले.नंतर लहान मुलांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लाऊन  त्याचे उद्घाटन गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी केली कार्यक्रमाचे उद्घाटक शाळेचे संचालिका सौ रुपाली उभे कार्यक्रमांना अध्यक्ष श्री अमोल राव उभे तसेच कार्यक्रम संचालन तेजस्विनी इंगळे आभार प्रदर्शन प्रिया ठाकरे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात  कांचन गावंडे, गायत्री ,कातखेडे राधिका गावंडे ,प्रांजली मुळे साक्षी पुंडे,भावना राऊत, यांनी परिश्रम घेतले.               जहिरात व बातमी साठि  संपर्क करा