बर्निंग ट्रकचा थरथरार लाखोचे नुकसान कारंजा अमरावती रोडवर टाकळी फाट्याजवळ ची घटना
दि 12/1/24 सविस्तर वृत्त असे की कल्याण मुंबई वरून अमरावती साठी निघालेला ट्रक क्रमांक MH05AM2922सोमनाथ सानप यांच्या मालकीचा असलेला अमरावती रोडवर कामगारगाव समोर असलेल्या टाकळी फाटा जवळ अचानक चालत्या ट्रक मध्ये शॉर्टसर्किटमुळे सकाळी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. चालका अजय कुमार गौतम व क्लीनर याचा लक्षात येताच. त्याने ट्रकला थांबून. कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल यांना तात्काळ माहिती दिली.
नेहमी तत्पर असणारा कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल. मुख्याधिकारी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले त्यामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रकमध्ये बर्थडे केक व लोखंडी चेअर्स असा लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला. पण कारंजा अग्निशामक दलाने अतक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले
त्यावेळी नगरपरिषद अग्निशामक दलाचे अधिकारी बातमसाहेब. चालक रेवाळे संजय फायरमॅन आमद खान शुभम झोपाटे यांच्या प्रयत्नामुळे आगीवर नियंत्रण मिळविले. वाशिम विभागांमधून कारंजा अग्निशामक दल हे वेळेवर दाखल होण्यास सगळ्यात अग्रेसर असते. त्यावेळी धनंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी पण वेळेवर मदतीसाठी धावले. पुढील कारवाई धनज पोलीस स्टेशन करीत आहे,
0 Comments