अकोला : सत्यशोधक चित्रपट बघण्यासाठी टॅक्स फ्री व विद्यार्थ्यांना 26 जानेवारी पासून विशेष सवलत ज्येष्ठ युवा यांची चित्रपट पाहण्यासाठी विशेष गर्दी

अकोला : सत्यशोधक चित्रपट बघण्यासाठी टॅक्स फ्री व विद्यार्थ्यांना 26 जानेवारी पासून विशेष सवलत ज्येष्ठ युवा यांची चित्रपट पाहण्यासाठी विशेष गर्दी
अकोला प्रतिनिधी

दिनांक 28 जानेवारी 2024
अकोला महाराष्ट्रातील नुकताच प्रसिद्ध झालेला मराठी चित्रपट सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले महापुरुषांच्या यांच्या सत्य घटनेवर आधारित आहे या चित्रपटासाठी अकोला येथील न्यू रिगल टॉकीज व मिरज टॉकीज 2 शो मोठ्या थाटात सुरू आहे आज चौथा आठवडा असून सुद्धा यशस्वीरित्या मोठ्या उत्सवात लोकांची चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत आहे त्याकरिता आज बाळापूर येथील पत्रकार तथा समाजसेवक गणेश नथुजी सुरजुसे व पत्नी शारदा गणेश सुरजुसे सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी मिरज टॉकीज मध्ये सत्यशोधक चित्रपट पाहण्यासाठी सहपरिवार उपस्थित होते त्यावेळेस गणेश सुरजुसे यांनी मुलीची सर्वप्रथम शाळा काढलेल्या सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी अन्याय अत्याचार सहन करून समाजासाठी दिलेल्या योगदान या चित्रपटामध्ये प्रत्यक्ष सर्वांनी बघावे असे प्रत्यक्ष बोलताना सांगितले तसेच या चित्रपट पाहून आपण सुद्धा त्यांनी केलेल्या संघर्षमय कार्याविषयी बोध घ्यावा व हा चित्रपट विद्यार्थी पालक व युवांनी व विशेष महिलांनी प्रत्यक्ष एक वेळ बघावा असे बोलताना सांगितले,
             बातमी व जाहिराती साठि  संपर्क करा
 

Post a Comment

0 Comments