तामसी जि.प शाळेतील विद्यार्थ्यांचा महान केंद्रा कळून सत्कार,जिल्हास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा मध्ये उपविजेतापद पटकविल्याबद्दल करण्यात आले सत्कार

तामसी जि.प शाळेतील विद्यार्थ्यांचा महान केंद्रा कळून सत्कार,
जिल्हास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा मध्ये उपविजेतापद पटकविल्याबद्दल करण्यात आले सत्कार
प्रतिनिधी बार्शीटाकळी,,,
बार्शीटाकळी, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला अंतर्गत नुकताच जिल्हास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धा संपन्न झाली यामध्ये महान केंद्रातील तामसी जिल्हा परिषद शाळा व निंभारा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उप विजेता पद पटकविल्याबद्दल विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विद्यार्थ्यांना खेळातील यशस्वी विजय बद्दल जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले असून महान केंद्राचे नाव जिल्हाभरात उज्वल केल्याबद्दल व भविष्यात विद्यार्थ्यांना त्यांनी केलेली कामगिरीबद्दल प्रोत्साहन मिळावे तसेच विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळावा या करिता अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे जिल्हाध्यक्ष व महान केंद्राचे मा केंद्रप्रमुख डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांनी जिल्हा परिषद शाळा तामसी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा सत्कार केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहिद इक्बाल खान हे होते तसेच प्रमुख उपस्थिती मनहून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  
सुनील ढोरे हे होते या वेळी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आले या वेळी  विद्यार्थ्यांसाठी विशेष मेहनत घेणारे शाळेचे मुख्याध्यापक शंकर बळीराम पिलात्रे तसेच युवा उपक्रमशील क्रीडा शिक्षक नामदेव व्यंकटराव देवकते यांचा ही सत्कार  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सखाउल्लाह खान समिउल्लाह खान मोहन नागे विकास नागे आदि प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन नामदेव व्यंकटराव देवकते यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती तामसी गावातील विद्यार्थी जिल्हास्तरावर उप विजेता ठरल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे,
                जहिरात वबात्मी साठी संपर्क साधा

Post a Comment

0 Comments