कारंजा(लाड) सविस्तर वृत्त असे की संपूर्ण भारतामध्ये दोन आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव संस्थान असलेले कारंजाचे आराध्य दैवत कुलस्वामिनी आई कामाक्षा मंदिर कारंजा येथे भव्य महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वप्रथम कुलस्वामिनी आई कामाक्षा मातेची महाआरती करण्यात आली.
त्यानंतर आराध्य लोकप्रिय माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तराज डहाके यांच्या हस्ते प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला . आई कामाक्षा माताचे मुख्य पुजारी श्री दिगंबरजी महाजन व्यवस्थापक रोहितजी महाजन तसेच प्राध्यापक राहुल महाजन व कामाक्षा माथेचे गोंधळी श्री दिनेश कडोळे कमलेश कडोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यावेळी कारंजातील असंख्य भाविकांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच कारंजातील अनेक अन्नदात्यांनि त्यामध्ये व्यावसायिक दुकानदार पत्रकार तसेच ज्येष्ठ सदस्यांनी या यावेळी अन्नदान केले. त्यावेळी आई कामाक्षा मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. त्यावेळी कामाक्षा मित्र मंडळाचे अनेक सदस्यांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रसादाचे वाटप केले.
0 Comments