बार्शिटाकळी नगर पंचायत वार्ड नं. ९ मध्ये बुध्द विहार व मस्जीद पासून पोस्ट ऑफीस पर्यंत होत असलेले सांडपाण्याच्या नालीसह पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम इस्टिमेट नुसार न होता अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्याचे बिल थांबवून निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव काळ्या यादीत टाकून कार्यवाही करणया ची तकरार

बार्शिटाकळी नगर पंचायत वार्ड नं. ९ मध्ये बुध्द विहार व मस्जीद पासून पोस्ट ऑफीस पर्यंत होत असलेले सांडपाण्याच्या नालीसह पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम इस्टिमेट नुसार न होता अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने त्याचे बिल थांबवून निकृष्ट काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे नाव काळ्या यादीत टाकून कार्यवाही करणया ची तकरार
बार्शीटाकली नगर पंचायत वार्ड नं. ९ मध्ये बुद्ध विहार व मस्जीद पासून पोस्ट ऑफीस पर्यंत होत असलेले सांडपाण्याच्या नालीसह पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम सुरु आहे. सदरचे काम मुळात इस्टिमेट नुसार न करता कॉन्ट्रॅक्टर मनमानी पध्दतीने करीत आहेत. सदर सांडपाण्याच्या नाल्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या करण्यात आल्या असून त्या इस्टिमेट नुसार झाल्या नाहीत तसेच पेव्हर ब्लॉकचे काम सुध्दा अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. पेव्हर ब्लॉक चा दर्जा हा अत्यंत निकृष्ट आहे. 
सदर कामाचे कॉन्ट्रॅक्टर हे मनमानी पध्दतीने कोणालाही न जुमानता काम करीत आहेत. सदर नाली व पेव्हर ब्लॉक रस्त्याचे काम हे एकदाच होईल मात्र ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने काही दिवसात त्याची वाट लागेल व सांडपाणी साचून व पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर पाणी साचून परिसरातील नागरीकांना त्याचा खूप त्रास होणार आहे. व भविष्यात वाद विवाद सुध्दा होण्याचा धोका आहे. सदर निकृष्ट कामावर सुपरवायझर म्हणून कोणत्याही इंजिनिअरने पाहणी केली नाही. कॉन्ट्रेक्टरने थातुरमातूर काम करुन काम निपटविण्याच्या तयारीत आहेत.
ह्याबाबत संबंधितांना नागरीकांनी वारंवार सूचना देऊनही त्यावर अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही व कॉन्ट्रॅक्टर मनमानी पध्दतीने निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. तरी शिवसेना उद्धव गट चे महिला आघाडी च्या वतीने एक निवेदन जिल्हाधिकारी अकोला ना निवेदन दिनयात आले, या निवेदन मध्ये नामुद सदरचे काम करणान्यारया  कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे व जो पर्यंत इस्टिमेटनुसार काम होत नाही तोपर्यंत त्याचे बिल थांबविण्यात यावे ही विनंती. असे न झाल्यास आम्हाला नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल व ह्याची सर्वस्वी जबाबदारी नगर पंचायत व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी. अशी मांगनी शिवसेना महिला आघाडी च्या वतीने करण्यात आली असून या वेळेस शिवसेना महिला उप संघटक बार्शीटाकली,रुक्मणि सोनोने,उमेश राउत शहर प्रमुख,शेख मुन्तज़िर,सुरेश बदीराम इंगले,मो, अय्याज़,भीमराव सदंशिव, अज़हर,सिद्धार्थ प्रधान,उपस्थित होते,


Post a Comment

0 Comments