शारदा देवी विसर्जनासाठी गेलेल्या गणेश देवकते यांचा अपघातात मृत्य.

शारदा देवी विसर्जनासाठी गेलेल्या गणेश देवकते यांचा अपघातात मृत्य.
कारंजा श. प्र.
स्थानिक गायकवाड नगर बायपास मधील शारदा देवी विसर्जनासाठी गेलेले गणेश देवकते यांचा ट्रक ने उद्वील्याने त्यात त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असून अतिशय आनंदमय वातावरणात शारदे ला विसर्जित करताना या आनंदात विरजण पडले .सविस्तर वृत्त असे की दि 27/10/23 काल साडेआठच्या सुमारास इंझोरी येथील अडाण नदीच्या पुलावर शारदा देवीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस भाविक आरती करत होते. कारंजा वरून मानोरा कडे भर धाव जाणारा ट्रक क्रमांक MH 04 CU4147 असलेल्या ट्रक चालकाने त्या भाविकास चिडत नेले या अपघातामध्ये गणेश देवकते वय 37 रा गायकवाड नगर कारंजा अत्यंत गंभीर झाले या अपघाताची माहिती तात्काळ लक्ष्मी ज्वेलर्स संचालक मंगेश कडेल यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्नेसेवक रमेश देशमुख यांना दिली तात्काळ रुग्णसेवक रमेश देशमुख घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयाल कारंजा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी ऑर्थोपेटीक सर्जन डॉ.मोरे यांनी त्याच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. त्यावेळी मदतीसाठी कक्षसेवक पांडे मेस्को सिक्युरिटी सागर खंडारे प्रसन्ना काळबांडे श्याम घोडेस्वार संत गाडगेबाबा रुग्णवाहिकचे विनोद खोड छोटू उईके श्री राजूभाऊ ठाकरे श्री गुरुमंदीर रुग्णवाहिकाचे रमेश देशमुख मंगेश कडेल यांनी मदत केली.शारदा मातेची आरती करताना झालेला अपघात इतका भीषण होता की त्यात गणेश देवकते हे बरेच दूर चीरडत गेले यात त्याचा मृत्यू झाला गणेश च्या अवेळी जाण्याने गायकवाड नगर बायपास परिसरात शोककळा पसरली त्याच्या मृत्यू मुळे बायपास परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments