एकीकडे शेतकऱ्यांना सोयाबीनचे सरासरी पेक्षा कमी उत्पादन झाल्यामुळे शेतकरीआधीच हवाल दिल झाला आहे त्यातच रोगराई प्रादुर्भावामुळे कपाशीचे सुद्धा उत्पादन घटले आहे
सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्यामुळे लागलेला खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे त्यातच भाव कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे पीक विम्याचे पैसे अद्याप पर्यंत मिळालेले इत्यादी समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा. शरद पवार साहेब यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेश संघटक सचिव रवी राठी, रा. काँ. ओबीसी सेल तालुका अध्यक्ष विष्णू लोडम, वासुदेव शेगोकर, सुभाष चौधरी इत्यादी कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन ही समस्या लवकर निकाली काढावी ही विनंती केली
0 Comments