अलफैज फाउंडेशन जळगाव तर्फे मोहम्मद इसहाक बागवान, राज मोहम्मद खान शिकलगर आणि मोहम्मद उस्मान शेख हे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा दि. 12.10.2023 रोजी सिरतुन नबी स. ह्या कार्यक्रमात पार पडला. मोहम्मद इसहाक बागवान हे लावारिस मृतदेहांचे अंतिम संस्कार करण्याचे कार्य करत आहे राज मोहम्मद खान शिकलगर हे लोकांना तंबाखू गुटखा अशा व्यसनापासून रोखण्याचे कार्य करत असतात त्यांनी कॅन्सरवर मात करून लोकांना तंबाखू गुटखा व्यसनापासून दूर करण्याचे कार्य स्वखर्चाने करत असतात.
मोहम्मद उस्मान शेख हे सुरमेज फाउंडेशनचे अध्यक्ष असून त्यांनी विविध मार्गाने समाजाची सेवा करत आहे. अश्या करत असलेले उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अलफैज़ फाउंडेशन द्वारा या तिघांना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अलफैज फाउंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अ. करीम सालार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोहेल आमीर तसेच अलफैज़ फाउंडेशनचे अध्यक्ष अ. अजीज सालार, सचिव मुश्ताक सालार आदी मान्यवर उपस्थित होते.
एड बतमी जाहिरत के लिए हम से सम्पर्क करे
0 Comments