पातुर येथे ऐतिहासिक दसरा मैदानावर उल्लेखनीय पत्रकारिता केल्याबद्दल पत्रकार देवानंद गहिले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

पातुर येथे ऐतिहासिक दसरा मैदानावर उल्लेखनीय पत्रकारिता केल्याबद्दल पत्रकार देवानंद गहिले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार
पातूर तालुका प्रतिनिधी
पातुर ही एक ऐतिहासिक सांस्कृतिक देव-देवतांची भूमी असून गेल्या अनेक वर्षापासून या गावाचे महत्त्व महाराष्ट्र राज्यात परिचित आहे,पातूरची संस्कृती ऐतिहासिक चळवळी, पुरातत्त्व भुयार, गुफा, नानासाहेब मंदिर, रेणुका माता मंदिर, कवळेश्वर मंदिर, खडकेश्वर मंदिर, श्री सिदाजी महाराज मंदिर, सीता न्हानी, गिन्यांची गाथा, शहरातील पौराणिक मंदिर, व्यक्ती विशेष, आखाड्यांची परंपरा असलेले वैभव, कुस्त्यांची चळवळ यासह शैक्षणिक क्षेत्रातील वृत्तलेखन अतिशय चोखंदळ करून सामाजिक योगदान दिले यामुळे या योगदानाबद्दल पातुर येथील पत्रकार देवानंद गहिले यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन दसरा उत्सव समिती आणि श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळा यांच्यावतीने हा सन्मान करण्यात आला आहे यावेळी पत्रकार देवानंद गहिले यांना माजी आमदार बळीराम सिरस्कार, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश भाऊ तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हा अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे, महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकरराव बोचरे यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह आणि पुरस्कार सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सत्कार केला आहे पत्रकार देवानंद गहिले गेल्या अनेक वर्षापासून सकारात्मक आणि परिणामकारक लोकाभिमुख पत्रकारिता करीत असून त्यांनी अनेक उपेक्षित घटकांना वृत्ताचे लेखन करून समोर आणले आहे अलीकडे "कृष्णाली बोलू लागली" नांदखेड या गावातील घटना एकाच दिवशी संपूर्ण राज्यभर प्रसारित झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून पातूरचे वैभवाचे देवानंद गहिले लेखन करत असून गतवर्षी सुद्धा पातूरच्या प्राचीन गिन्यांचे वैभव उत्खनन आणि सांस्कृतिक परंपरेचे ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वांरशाचे त्यांनी एका पुरवणी मध्ये लेखन करून पातुर वैभव मांडून पातूरच्या सांस्कृतिक ऐतिहासिक वाटचालीला अवगत करून दिले आहे त्यामुळे या सत्कार समारंभाचे आयोजन दसरा मैदानावर करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजु उगले यांनी केले होते
सदर कार्यक्रमाकरिता हजारो ग्रामस्थांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments