करंजा प्रतिनिधी
दि 31/10/23 सविस्तर वृत्त असे की समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. अशातच 175 लोकेशन समृद्धी महामार्गावर टोमॅटोला भरून असलेला ट्रकचा स्टेरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात झाला. सदर ट्रक हा डिवाइडेड ला धडकून पलटी झाला.
त्यामध्ये ट्रकचालक हलील खान व 22 क्लीनर खालील उद्दीन वय 18 किरकोळ जखमी झाले प्रथा नाशिकवरून कोलकत्यासाठी जात होता. अपघाताची माहिती गजानन करडे रा कारले यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तात्काळ टोलनाका समृद्धी महामार्ग 108 पायलट विधाता चव्हाण यांना संपर्क केला. तात्काळ विधाता चव्हाण यांनी आपली रुग्णवाहिका डॉ मोटवानी.मॅडम फायर टीम वैभव जाधव कृष्णा सोनवणे सुमित गोदे व महाराष्ट्र सुरक्षा फोर्स बाळकृष्ण सावंत विजय कमल हे घटनास्थळी दाखल होऊन पायलट विधाता चव्हाण यांनी रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले. तेथील वैद्यकीय डॉक्टर चव्हाण सर यांनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले.
0 Comments