जळगाव | २४ डिसेंबर २०२५ | जळगाव जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि वाहतूक शिस्तीसाठी पोलीस प्रशासनाने आज संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन तपासणी मोहीम’ राबविली.
या मोहिमेत तब्बल ११०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ₹१३,७१,४५०/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी कडक नाकाबंदी ठेवून कारवाई केली.
विशेषत: विना नंबर प्लेट वाहने व अल्पवयीन वाहन चालक या श्रेणींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
📊 कारवाईचा तपशील:
विना नंबर प्लेट / फॅन्सी नंबर प्लेट
कारवाई: ४६३ वाहनांवर
वसूल दंड: ₹४,४५,०००/-
अल्पवयीन वाहन चालक
कारवाई: १०७ प्रकरणे
वसूल दंड: ₹४,०४,५००/-
(अल्पवयीन मुलांना वाहन देऊ नये अशी पालकांना सूचना)
इतर वाहतूक नियम उल्लंघन
कारवाई: ५३६ वाहनांवर
वसूल दंड: ₹५,२१,९५०/-
🚔 पोलिसांचा इशारा:
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
👮 सक्रिय भूमिका:
जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव वाहतूक शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

0 Comments