जळगाव पोलीसच्या कार्यालयात 100 किलोवॉट सोलर प्लांट कार्यान्वित

जळगाव:
जळगाव शहराचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे Sunstroat Green Technology Pvt. Ltd. कंपनीच्या 100 किलोवॉट क्षमतेच्या सोलर प्लांटचे उद्घाटन मा. श्री. रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालय, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधीक्षक (जळगाव भाग) कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा अशा विविध संगणकीकृत शाखा कार्यरत आहेत.
 या सर्व शाखांचा एकत्रित मासिक वीज वापर अंदाजे 10,000 ते 11,000 युनिट्स इतका आहे.

 या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या छतावर सुमारे 4,000 ते 5,000 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात एकूण 184 सोलर पॅनल्स बसवण्यात आले आहेत.
 या सोलर प्लांटमुळे दररोज किमान 300 युनिट्स वीज निर्मिती होणार असून, उन्हाळ्यात ही क्षमता 400 ते 450 युनिट्सपर्यंत पोहोचणार आहे.
 त्यामुळे कार्यालयाचा वीज बिल खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून अतिरिक्त वीज निर्मितीही शक्य होणार आहे.
 या उद्घाटन प्रसंगी मा. श्री. रोहन घुगे (जिल्हाधिकारी जळगाव), मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक जळगाव), मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक जळगाव), मा. श्री. आव्हाड (पोलीस उप अधीक्षक – गृह), मा. श्री. नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव भाग), श्री. सतीश गोराडे (पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा), श्री. राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), तसेच श्री. प्रशांत सुगरवार (राखीव पोलीस निरीक्षक जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.

हरित ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि शासकीय खर्चात बचत या दृष्टीने जळगाव पोलीस प्रशासनाने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments