जळगाव: एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावत दोन आरोपींना अटक केली.
त्यांच्या ताब्यातून ८ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
१५ नोव्हेंबर २०२५ रोजी विलास मधुकर जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुन्हे शाखेला तपासासाठी विशेष निर्देश दिले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारावर २३ नोव्हेंबर रोजी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
त्यात विजय शांताराम पाटील (४१, रा. कलावसंत नगर) आणि जितेंद्र छोटूलाल जाधव (वय- ४४ वर्ष, रा. ज्ञानदेव नगर) यांचा समावेश आहे.
चौकशीत त्यांनी फिर्यादीकडून हिसकावून नेलेली रक्कम लपवून ठेवल्याचे मान्य केले.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून संपूर्ण ८ लाख रुपये हस्तगत केले.
दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे तसेच प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, सिद्धेश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे (स्थानीक गुन्हे शाखा) आणि नेत्रम, सायचर येथील अधिकाऱ्यांचेही योगदान राहिले.

0 Comments