धुळे जिल्ह्यातून मोटार सायकल चोर LCB च्या जाळ्यात

जळगाव:
 धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. 
पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 307/2024 भादंवि 379 प्रमाणे मोटारसायकल चोरीची नोंद झाल्यानंतर या प्रकरणात तपास सुरू होता.

जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दोषींना शोधून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
 त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. जितेंद्र वल्टे यांच्या पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपी मनोज पाडुरंग गायकवाड याला लामकाणी (ता. धुळे) येथून अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीने एक होंडा शाईन आणि दोन काळ्या रंगाच्या युनिकॉर्न अशा तीन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी तिन्ही वाहने जप्त केली असून संबंधित गुन्हे पारोळा पोलीस स्टेशन आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकामध्ये पोउनि. जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु बि हाडे, पोह. दिपक माळी, पोह. रविंद्र पाटील, पोकॉ. रावसाहेब पाटील आणि चालक दिपक चौधरी यांनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments