३४२ सिलेंडर गॅस रिफीलींग केलेले ट्रक क्रमांकासह १४ नोव्हेंबरच्या रात्री परिसरात उभे केले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रकमधील ६१ सिलेंडर चोरीस गेल्याचे उघड झाले.
या वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधून एमआयडीसी परिसरात सापळा रचीत १८ नोव्हेंबर रोजी मुख्य आरोपी शेख फिरोज शेख याकुब याला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरी केलेले ६१ सिलेंडर (किंमत अंदाजे १,२२,००० रुपये) आणि गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन (किंमत सुमारे ५ लाख रुपये) जप्त केले आहे.
ही कारवाई पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, सफी विजयसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकॉ नितीन ठाकुर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठे यांच्या पथकाने केली.
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


0 Comments