त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी,बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन।

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी,
बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तहसीलदारांना निवेदन
बाळापूर प्रतिनिधिन,,अनीस खान
त्र्यंबकेश्वर जि.नाशिक येथे शनिवार दि.२० सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे, अभिजित सोनवणे आणि किरण ताजने ह्यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला. हल्ल्यात किरण ताजने हे पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार आणि वास्तव घटनांचा आवाज बनणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले निंदनीय आहेत. पत्रकारांवर असे वारंवार होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची सर्व पत्रकार संघटनांतर्फे त्याचं प्रमाणे बाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र जाहीर निषेध करण्यात आला. तसेच सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन त्या हल्लेखोर गुंडावर त्वरीत कडक कारवाईची मुख्यमंत्री मार्फत मा.वैभव फरतारे तहसीलदार, बाळापूर जि. अकोला यांना निवेदन देवून मागणी करण्यात आली. निवेदनात हल्लेखोरांना तातडीने अटक करून कारवाई करण्याची, तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना आखण्याची सुद्धा मागणी करण्यात आली.
निवेदन देते वेळी बाळापूर तालुका पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष दिपक रौंदळे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखडे, जेष्ठ पत्रकार रमेश ठाकरे, उमेश जामोदे, दिपचंद चव्हाण, अनिस खान, गजानन सुरजुसे, काझी रफत खान, डॉ.अतिकुर रहेमान,अनिल गिऱ्हे, शहाबाज देशमुख, राजेश्वर वैराळे, अनिल दंदी, मोतेबर देशमुख, अमोल जामोदे, सुधीर कांबेकर, काझी ऐहतेशाम, शिवदास जामोदे, उमेश म्हैसने, काझी मेहंदी हसन, अमोल ढोके, प्रा.राजेंद्र थेटे, प्रा.शोऐबोद्दीन शेख, रवी वखरे, अख्तर शाह, बिस्मिल्लाह शाह, हमीदोद्दीन ग्यासोद्दीन, शकील अहेमद यासह बाळापूर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य पत्रकार बांधव उपस्थिती होते।

Post a Comment

0 Comments