पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या वाढदिवसा निमित्त व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत -कान्हेरी सरप येथे विशेष ग्रामसभा चे आयोजन।

पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या वाढदिवसा निमित्त व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत -कान्हेरी सरप येथे विशेष ग्रामसभा चे आयोजन।
कान्हेरी प्रतिनिधि,इमरान खान
बार्शीटाकली चे ग्राम कानहेरी येथे सरपंच श्री सुनील श्रीराम ठाकरे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करून ग्रामविकास स्तरावरील मा.मुख्यमंत्री यांचा लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला. 
या कार्यक्रमाला सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्वच्छतेचे जनक  गाडगेबाबा यांच्या फोटोला पूजन व  हार अर्पण *मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय ठमके / मा. ग.वि.अ. पं.स. बार्शीटाकळी श्री रविकांत पवार  / मा सरपंच श्री सुनील भाऊ ठाकरे* यांचे हस्ते करण्यात आले.
उपस्थित ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज हा कार्यक्रम 17 सप्टेंबर 31 डिसेंबर  पर्यंत शासनाने ठरवून दिलेल्या आठ मुद्द्यावर हा कार्यक्रम घ्यायचा याबाबत व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना बाबत माहिती मा. अति मु.का.अ./ गटविकास अधिकारी /विस्तार अधिकारी पंचायत श्री दीपक इंगळे यांनी ग्रामस्थांना दिली व अभियाना सहभागी होण्याबाबत आव्हाहन केले. व सदर कार्यक्रमाला राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर श्री. संतोष चक्रनारायण यांनी मार्गदर्शन केले.
 सदर विशेष ग्रामसभेला व कार्यक्रमाला सरपंच श्री सुनील श्रीराम ठाकरे/ उपसरपंच श्री ज्ञानेश्वर साहेबराव सरप /सर्व ग्रामपंचायत सदस्य गण/ तंटामुक्ती अध्यक्ष/ ग्रामपंचायत अधिकारी श्री शिवदास एम. गवई / शाखा अभियंता श्रीमती अनिता भगत / जि प शाळा मुख्याध्यापक व शिक्षक वृंद / तलाठी श्रीमती माधुरी खरात /रोजगार सेवक /कम्प्युटर ऑपरेटर व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग तसेच आरोग्य सेवक / आशा सेविका/ अंगणवाडी सेविका व मदतनीस /महिला गटप्रवर्तक /महिला बचत गटातील महिला यांच्यासह *कान्हेरी सरप* गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments