महान बालशिवाजी कॉन्व्हेंट मध्ये रक्षाबंधनातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश
बार्शिटाकळी :- तालुक्यातील महान येथील बाल शिवाजी इंग्लीश कॉन्व्हेंट मध्ये रक्षा बंधनातून दिल्या गेला हिंदु मुस्लीम ऐक्याचा संदेश.सामाजीक एक्याची शिकवण शालेय जीवनातूनच मुलामुलींना दिली गेली तर धर्म-जातीभेद नष्ट होतील, हाच संदेश देत महान येथील बालशिवाजी शाळेत रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महान येथील ग्रामपंचायत सदस्य रिजाज खान सरफराज खान यांच्या कन्या माहीन हिने शाळेतील विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण संयुक्तपणे साजरा करत हिंदू-मुस्लिम एकोप्याचे सुंदर दर्शन घडवले.
या वेळी महान ग्राम पंचायतचे (सरपंच) सुनिल ढाकूलकर, (उपसरपंच)अब्दुल रहेमान, संतोष पांगृत, संदीप पाटील जानोरकर, प्रकाश तायडे,रियाज खान सरफराज खान, शाळा समितीचे अध्यक्ष किशोर ठाकरे तसेच शाळेतील शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या रक्षा बंधाणाच्या कार्यक्रमातून गावातील बंधुभाव, सलोखा आणि ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पसरविण्यात आला.
0 Comments