'स्वच्छ उदयनगर' साठी घंटागाडी सेवे चे शुभारंभ। विशेष म्हणजे सरपंच मनोज लाहुडकार यांनी केली दोन एक्कर डम्पिंग ग्राउंड चि वेवस्था।
उदयनगर : स्वच्छतेची समस्या आणि गावातील नागरिकांचे आरोग्य या गंभीर बाबी लक्षात घेऊन उदयनगर ग्रामपंचायतीने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करत, सरपंच मनोज सारंगधर लाहुडकर यांच्या नेतृत्वाखाली १२ ऑगस्ट रोजी 'घनकचरा संकलन गाडी' (घंटा गाडी) सेवेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे 'स्वच्छ उदयनगर' ही संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे.
यावेळी बोलताना सरपंच मनोज लाहुडकर यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, "गावातील प्रत्येक घरातून निघणारा ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून या गाडीत टाकावा. ही एक साधी कृती आपल्या गावाला स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अत्यंत मोलाची ठरेल." या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी त्यांनी ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन केले.
ग्रामपंचायतीच्या या नव्या कचरा व्यवस्थापन पद्धतीमुळे पर्यावरणालाही मोठा फायदा होईल. कचरा ओला आणि सुका अशा दोन भागांत विभागल्यामुळे त्याचे योग्य वर्गीकरण करून विल्हेवाट लावणे सोपे होईल. यासाठी गावाजवळ दोन एकर जागा उपलब्ध करून डंपिंग ग्राउंड तयार करण्यात आले आहे. तसेच, काही दिवसापूर्वी प्रत्येक घराला दोन कचरा कुंड्यांचे वाटपही करण्यात आले होते.
या नव्या उपक्रमामुळे गावातील नागरिकांचे आरोग्यमान उंचावेल आणि रोगराईचा धोका कमी होण्यास मदत होईल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील अनेक उत्साही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, उदयनगरने स्वच्छतेच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.
0 Comments