सोन्याच्या नकली गिन्या दाखवून चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांना १० लाखांनी लुटले ,ईसोली-सावरखेड रोडवर घडली घटना।अमडापूर पोलीसांनी १२ तासांच्या आत आरोपींना केले जेरबंद।

सोन्याच्या नकली गिन्या दाखवून चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांना १० लाखांनी लुटले ,
ईसोली-सावरखेड रोडवर घडली घटना।
अमडापूर पोलीसांनी १२ तासांच्या आत आरोपींना केले जेरबंद। 
रिपोर्टर,,, रफिक खान
उदयनगर : चंद्रपूर जिल्ह्यातील दोन जणांना सुरूवातीला असली सोने दाखवून स्वस्त सोने खरेदी करण्याच्या आमिषाला बळी पडून सोने खरेदीसाठी आलेल्या चंद्रपूर येथील दोन जणांना सोने नकली असल्याचे समजताच खरेदी साठी नकार दिल्याने पाच ते सात जणांनी हातामध्ये कोयता घेऊन झोपून काढून १० लाख ४६ हजार रुपयाने लुटून दरोडा घातला हि घटना दि.१९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ माजली होती. सदर घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलीस स्टेशन ठाणेदार निखिल निर्मल व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचून तत्काळ घटनेचा तपास सुरू केला. 
         सदर घटनेबाबत राजेश महादेव नगराळे वय ३८ वर्ष धंदा मजुरी रा. सास्ती ता. राजुरा जि. चंद्रपुर यांनी समक्ष पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली कि माझा मित्र नामे गणेश भाउराव मडावी रा .चंद्रपुर यांचे सह येवून तोंडी रिपोर्ट देतो , मित्र गणेश भाउराव मडावी व बांधकामाचे कॉन्ट्रक्ट संबंधाने एकमेकां सोबत पैशाचे व्यवहार करीत असतो. दि.१३ ऑगस्ट रोजी माझे मित्र गणेश मडावी याने मला त्यांचे कामावरील अजय रा. जानेफळ याने फोनवर त्याचे शेतामध्ये सोन्याचे नानी सापडलेले आहे. ते त्याला विकणे असे आहे. कमी पैशामध्ये सोन्याचे नाणे देतो तुम्ही जानेफळ येथे येवुन सोन्याचे नाणे बघुन जा असे सांगितले आहे. असे सांगितल्याने दि.१५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी अंदाजे ४:३० च्या सुमारास जानेफळ येथे जावुन अजय याला भेटलो. त्या वेळी अजय यांचे सोबत अजुन दोन इसम एक वय ६० वर्ष व एक अंदाजे २३ वर्ष असे दोघे जन हजर होते. अजय याने आम्हाला त्याचे जवळील पिवळ्या रंगाचे धातुचे ०२ नाणे वजन अंदाजे ०२ ग्रम चे नाणे माझे हाथात दिले व सोने आहे .खात्री करुन घ्या असे सांगितल्याने मी दोन्ही नाण्याची पडताळणी केली असता दोन्ही नाणे सोण्याची असल्याची खात्री झाल्याने अजय व त्याचे सोबत दोन्ही इसमानी आमच्या जवळ ३ किलो ३०० ग्रॅम सोन्याच्या गिन्न्या आहेत तुम्ही १० लाख रुपये द्या असे सांगितले तेंव्हा मी व गणेश मडावी त्यांना आम्ही पेशाची व्यवस्था करुन परत येतो असे सांगुन चंद्रपुर येथे परत गेलो. दिनांक १८ ऑगस्ट रोजी मी व माझा मित्र गणेश मडावी असे दोघे जन सोन्याच्या गिन्या घेण्यासाठी १० लाख रुपये घेवुन चंद्रपुर येथुन सायंकाळी ६ वाजता मित्र गणेश मडावी याचे हयुदाइ क्रेटा कंपनीचे गाडी क्रमांक एम एच ३४ बी. आर ७२२१ ने निघालो व दिनांक १९ ऑगस्ट रोजी चे सकाळी ७ वा जानेफळ बस स्टॉप येथे पोहचलो तेथे गणेश मडावी याने अजय याला फोन केला असता अजय याने आम्ही इसोली कडे रोडने या आम्ही रोडवर सोन्याचे गिन्या घेवुन थांबलो आहे. आम्ही इसोली रोडने गेलो असता आम्हाला रोडवर अजय व एक इसम मोटार सायकल घेवुन उभे होते. तेथुन अजय आमचे गाडी मध्ये बसला व आम्हाला म्हणाला की, इसोली सावरखेड बु. रोडवर गाडी घेण्यास सांगितली. त्याचे सोबतचा इसम आमचे मागे मोटर सायकल घेवून चालत होता. आम्ही थोड्या अंतरावर गेल्यावर अजय यांने गाडी उभी करायला लावली तेथे एक इसम वय अंदाजे ६० वर्ष उभा होता. तो आमचे गाडी जवळ आला व मला म्हणाला की पैसे आणले आहेत का तर मी त्याला हो म्हणालो तर तो मला म्हणाला की गाडीचे खाली उत्तरा व सोन्याच्या गिन्या पाहुन घ्या असे म्हणाला आम्ही गाडीचे खाली उतरून सोन्याच्या गिन्या पाहील्या परंतु त्या नकली असल्याचा आम्हाला संशय आल्याने आम्ही त्यांना म्हणालो की आम्हाला सोने नको असे म्हणुन परत गाडीकडे जात असतांना अचानक ५ ते ७ इसम त्यांचे हातामध्ये कोयते घेवुन त्यांनी आमचेवर हल्ला केला. मला व गणेश मडावी याला मारहाण करून गणेश मडावी यांचे खिशातील १००००/- त्याचे हातामधील कैंसिओ जीशाँक कंपनीची घडयाळ की अंदाजे ८०००/-पेवुन गाडीची चाबी घेवुन गाडी मधील माझे काळया रंगाचे बग मध्ये रोख नंगदी १० लाख रुपये व गाडी मध्ये असलेले आमचे दोघाचे मोबाइल एक एल जी कंपनीचा मोबइल ज्या मध्ये जिओ कंपनीचे सीम ७७५७९८४७७९ कीमंती अंदाजे १००००/-२- ओप्पो कंपनीचा मोबाइल ज्या मध्ये जियो कंपनीचे सीम ९१३०३४४४७९, असेलेला मोबाइल किमंती वअदाजे १००००/- गणेश मडावी यांचे गाडी मध्ये असलेले ८०००/- रुपये असे एकुन १० लाख ४६०००/- रुचा मुद्देमला घेवुन पळुन गेले. त्याचे पैकी क्रमाक १ अंगामध्ये निळ्या रंगाचा रेनकोट हातात लांब तलवार वय अंदाजे २५ वर्ष क्रमाक २ तोडाला पांढरा रुमाल बांधलेला अंगामध्ये पोपटी रंगाचे टी शर्ट हातात लोखंडी कोयता क्रमांक ३-पांढ-या रंगाचा कुर्ता वय अंदाजे ६० वर्ष हाता मध्ये चाकु अशा वर्णनाचे इसम होते त्या नंतर आम्ही आमचे सोबत घडलेल्या जानेफळ पोलीस स्टेशन येथे सांगितली व पोलीसांसह घटनास्थळावर गेलो. तेथे अमडापुर पोलीस स्टेशन चे पोलीस आल्यानंतर आम्ही त्यांना आमचे सोबत घडलेली घटना सांगितली असता अमडापुर पोलीसांनी त्यांचे मोबाइल मध्ये असलेल्या संशयीत लोकांचे फोटो आम्हाला दाखविले असता. मोबाइल मधील काही फोटो पैकी आम्हाला मारहान करुन आमच्या जवळील रोख रक्कम व मुद्देमाल एकुन १० लाख ४६०००/- मुद्देमाल घेवुन पळुन जाणारे ४ लोकांना आम्ही आळखले त्यांचे नाव १ इनेश सुभाष पवार २ सुभाष पवार ३ जगन शिंदे, ४ उमेश शिंदे क्र. १ व २ रा. दधम ता. खामगाव क्र. ३ ते ४ रा. धानोरी ता. चिखली असल्याचे आम्हाला पोलीसांकडुन समजले. वर नमुद लोकांनी गणेश मडावी यास चापटा बुक्यांनी तोंडावर छाती मध्ये मारहान केल्यामुळे गणेश मडावी यास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व त्याचे तब्येत ठिक नसल्याने व मी सुध्दा खुप घाबरलो होतो आता गणेश याची तब्येत ठिक असल्याने व मला बरे वाटत असल्याने आज दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी ७:२९ वा ते ८ वा दरम्यान इसम नामे १ इनेश सुभाष पवार २ सुभाष पवार ३ जगन शिंदे, ४ उमेश शिंदे व त्यांचे सोबतचे इतर ३ लोक नाव माहित नाही. क्र. १ व २ रा. दधम ता. खामगाव कं. ३ ते ४ रा. धानोरी ता. चिखली यांनी आम्हाला नकली सोन्याच्या गिन्या देण्याचा प्रयत्न करत मला व गणेश मडावी असे दोघांना मारहान करत आमच्या जवळी रोख रक्कम व मुद्देमला असा एकुन १० लाख ४६०००/- मुद्देमाल बळजबरीने हिसकावुन नेला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी ईनेश सुभाष पवार, सुभाष रोहिदास पवार दोघेही रा. दधम ता. खामगाव व उमेश छगन शिंदे रा.धानोरी ता.चिखली यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शनिवार २३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोघ गायकवाड, सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात अमडापूर चे ठाणेदार निखिल निर्मळ, भगवान शेवाळे, चंद्रशेखर मुरडकर, प्रदीप चोपडे, शिवाजी बिलघे, अच्युतराव सिरसाठ यांनी केली.इतर आरोपींचा शोध सुरू असून, लवकरात लवकर जेर बंद करण्यात येईल अशी माहिती पत्रकारांना दिले आहे शोध मोहीम सुरु आहे।

Post a Comment

0 Comments