अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेत निरोप समारंभ संपन्न

अलहसनात उर्दू प्राथमिक शाळेत  निरोप समारंभ संपन्न
 
रावेर प्रतिनिधि ( शेख शरीफ)

अलहसनात उर्दू प्राथमिक  शाळेचा निरोप समारंभ म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनात एकीकडे दुःख तर एकीकडे नव्या जगात प्रवेश करण्याची ओढ , आतुरता असते . निरोप समारंभ हा पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरावा या उद्देशाने अलहसनात उर्दू प्राथमिक  शाळेतील इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांचा ऐतिहासिक निरोप समारंभ कार्यक्रम  डी एम मॅरेज हॉल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या कार्यक्रमाची सुरुवात शिफा नाज़ यांनी पवित्र कुराण पठण ने  केली.    कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक   कुरबान शरीफोद्दीन हे होते.
या कार्यक्रमात शाळेतील उप शिक्षक शेख इमरान कमरुद्दीन यांनी आपल्या सुंदरनीय आवाजाने देश भक्ती गीत गायन केले.व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या मनोरंजन वाढविणे साठी एक चांगले गीत गायन केले.
टीचर का चहरा  सुहाना लगता है
स्टुडन्ट का  दिल दिवाना लगता है

निरोप समारंभ चे औचित्य साधून  विद्यार्थ्यांनी 
आपले मनोगत व्यक्त केले .
मा.मुख्याध्यापक कुरबान शरीफोद्दीन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण सुरु ठेवण्यास संबंधी आव्हान केले.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलासा ही दिला .
  तुम्ही घाबरू नका कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आमची आठवण आली तर तुम्ही आमच्या जवळ या आम्ही तुमच्या सोबत उभे राहू असा मोठा आश्वासन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशरा फातेमा आणि राहीला यांनी केले व आभार युशरा नाज़ यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
अशा प्रकारे उत्साहाने भारलेल्या वातावरणात ७ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला .

Post a Comment

0 Comments