नमाज पठन विरुद्ध गैरवर्तन करणारे पुलिस कर्मचारीवर गुन्हा दाखल करुन अटक करा

*नमाज पठण विरुद्ध गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा: जळगावातील विविध संघटनांची मागणी*
जलगांव:(शाह एजाज़ गुलाब)

 देशाची राजधानी दिल्लीतील इंद्रलोक भागात शुक्रवारची नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांसोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या गैर वर्तनाची बाब जळगाव शहरातील मुस्लिम समुदायाच्या विविध संघटना च्या पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जोरदार निदर्शने करून केंद्र शासन व दिल्ली पोलिसांचे लक्ष वेधले असून लाथ मारणारे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मनोज कुमार तोमार यांचा त्रिव निषेध करून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केलेली आहे  
सदर मागण्याचे निवेदन भारताचे राष्ट्रपती व  केंद्रीय गृह मंत्री यांना जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद यांच्या मार्फत देण्यात आले 

उपस्थितां पैकी सर्व श्री फारूक शेख,मुफ्ती हारून,मजहर खान,मतीन पटेल,अलफैज पटेल, नजिया अहमद, हाफिझ रहीम पटेल, सादिक मुलतानी ,अनिस शाह, अन्वर खान यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी उपनिरीक्षक नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला लाथ मारताना दिसत आहे.

 आरोपी मनोज कुमार या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येऊन भविष्यात  असे वर्तन पोलिस कर्मचाऱ्याकडून कधीही होऊ  नये या साठी शासनाने योग्य ती दखल घ्यावी असे सुद्धा सांगितले.  आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या या वर्तनामुळे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा पोलिस प्रशासनावरील अढळ विश्वास कमकुवत झाला आहे.  एवढेच नाही तर जगभरातील भारताच्या प्रतिमेलाही हानी पोहोचली.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, इतर धर्मांप्रमाणेच भारतातील मुस्लिमांनाही संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पोलिसांनी कर्तव्य बजावताना सामान्य नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन टाळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
*या वेळी खालील घोषणा देण्यात आल्या*
*दिल्ली पोलिस हाय हाय* 
*तोमर विरुद्ध गुन्हा दाखल करा*
*तोमर ला अटक करा, अटक करा*
*तोमर ला नोकरीतून कायम स्वरुपी काढून टाका*
*यांची होती उपस्थिती*
मुफ्ती हारून नदवी, हाफिज रहीम पटेल, मनियार बिरदरीचे अध्यक्ष फारुख शेख , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मझहर पठाण, इमदाद फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल, सामाजिक कार्यकर्ते अनिस शहा, एंजल फूडचे अध्यक्ष दानियल शेख, सिकलगर बिरादरी चे अन्वर खान,मरकज फाउंडेशनचे अब्दुल रऊफ टेलर, ताहेर शेख, दिव्यांग संघटनेचे मुजाहिद खान, ॲड आमिर शेख,ॲड आवेश शेख, मुलतानी बिरादरी चे सादिक मुलतानी,हाशिम मुलतानी, ईद गाह ट्रस्ट झकी पटेल व हरीश सैयद, अल्फैज पटेल, रज्जाक पटेल, नुर पटवे, वसीम  चौधरी,तर महिला मध्ये नाझिया अहमद,रुबीना अख्तर ,जरीना रउफ ,सकीना इस्माईल, रुबीना इकबाल, कमरूंनिसा ईकबाल , 
शबीना रिजवान, खदीजा मुखतार, मारिया साजिद व शकीला शहाबुद्दीन आदींची उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments