चिखलगाव येथील विहिरीत पडलेल्या ईसमाचा मृतदेह पिंजर येथील आपत्कालीन पथकाने काढला बाहेर, चिखलगाव ता.पातुर जि.अकोला येथील घटना,
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची कामगिरी
पातुर तालुक्यातील चिखलगाव येथील अनंत दयाराम तायडे वय अंदाजे (40) वर्ष हे गावात असलेल्या सार्वजनिक विहिरीवरील जाळीला कलर देत असतांना पडल्याची माहीती स्थानिक गावकऱ्यांकडून प्राप्त होताच पातुर ठाणेदार किशोर शेळके सर यांनी लगेचच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करिता प्राचारण केले
तेव्हा लगेच दीपक साबळे यांनी शोध व बचाव साहित्य घेऊन रुग्णवाहिका सह आपले सहकारी ऋषिकेश तायडे यांचे सह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळावरील सीन ट्रेस केला असता विहिरीमध्ये वीस फूट खोल पाणी आणि वरचा डिस्टन्स हा 30 फूट असल्याचे दिसून आले यावेळी लगेच ठाणेदार किशोर शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनात रेस्क्यू ऑपरेशन चालू केले आणि एका तासात गावकऱ्यांच्या मदतीने आत मधील पाण्यातला मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला यावेळी पातुर ठाणेदार किशोर शेळके सर चिखलगाव बीट चे ज. दिलीप इंगळे साहेब,रा. श्रीकांत पातोड साहेब, पो.काॅ.सत्यजित ठाकुर साहेब,आणी पोलीस कर्मचारी हजर होते.या मधे विषेश:त सहकार्य विजय तायडे मा.पं.स.गजानन तायडे मा.सरपंच,
प्रणव तायडे,ग्रा.पं.स. संघपाल तायडे,विकास तायडे,श्रीकांत तायडे,दिनेश डोंगरे,चेतन वरठे,अनिकेत तायडे,दीपक तायडे,अक्षय गोपणारायन,राहूल तायडे, अश्विन तायडे,आणी गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले.
0 Comments