🐬🪿🐥🐟🕊️🦤🦆🦅
*जमाआत-ए-इस्लामी हिंद महिला मंडळ, जळगाव तर्फे पर्यावरण स्नेही महिला दिनाचे आयोजन*
जळगाव : (शाह एजाज़ गुलाब)
महिला मंडळ जमाआ- त-ए-इस्लामी हिंद जळगाव आणि सागर मित्र फाउंडेशनच्या वतीने रेडक्रॉस सोसायटीच्या सभागृहात पर्यावरणपूरक महिला दिनाचे बुधवारी 6 मर्चला आयोजन करण्यात आला .आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मंडळाने, प्लास्टिक कचऱ्याच्या चांगल्या व्यवस्थापनावर विचारमंथन कार्यशाळा घेतली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोहम्मद समी साहिब यांनी मराठी भाषेत कुराण पठण करून कार्यक्रमात इस्लाम आणि पर्यावरण वर प्रकाश टाकला. शहर अध्यक्ष श्रीमती नसरीन साहिब यांनी कार्यक्रमाचे उद्देश सांगितले . कार्यशाळेत जमाआ त-ए-इस्लामीशी संबंधित सुमारे ६० महिला व विद्यार्थिनींनी पीपीटीच्या मदतीने प्लास्टिक कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन समजून घेतले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण जमाआ त-ए-इस्लामी महाराष्ट्राचे सल्लागार समितीचे सदस्य सोहेल अमीर साहब यांनी केले. त्यांनी स्वत:च्या भाषणात सर्व प्रकारच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजनांवर भर दिला.सर्व पाहुण्यांचे स्वागत महिला मंडळाने फुलांची रोपे, पुस्तके आणि कुराण देऊन केले. सर्व सहभागींना रेडक्रॉस तर्फे भेटवस्तू देण्यात आली आणि हिमोग्लोबिन तपासणी सेवा देखील प्रदान करण्यात आली.
खबरो=तथा विज्ञापन के लिए संपर्क करे
रशिद बागवान 8484819485
शाह एजाज़ 7385612883
0 Comments